High Court Saam tv
महाराष्ट्र

घरकाम सांगणं म्हणजे क्राेर्य नाही; उच्च न्यायालयाने विवाहितेला फटकारलं, सासरच्या मंडळींना दिलासा

पत्नीला कुटुंबातील कामे करायला सांगितले तर ते क्रौर्य होत नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया

औरंगाबाद - विवाहित महिलेला कुटुंबासाठी घरातील कामे करण्यास सांगितले म्हणजे तिने मोलकरणीसारखे काम करणे मानले जाणार नाही आणि तसेच ते क्रौर्य मानले जाणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठाने एका प्रकरणात असे स्पष्ट केले आहे.

यासोबतच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती राजेश एस. पाटील यांच्या खंडपीठाने पती आणि सासरच्यांविरुद्ध आयपीसी कलम ४९८ अ अन्वये नोंदवलेली एफआयआर रद्द करण्याचे निर्देश दिले आहे.

एका प्रकरणात महिलेने विभक्त पती आणि त्याच्या पालकांविरुद्ध घरगुती हिंसाचार आणि क्रूरतेच्या अंतर्गत तक्रार दाखल केली होती. लग्नानंतर केवळ महिनाभर तिला चांगली वागणूक देण्यात आली. मात्र, त्यानंतर घरकाम करणाऱ्या नोकरांसारखी वागणूक देण्यात आली, असा आरोप या प्रकरणातील महिलेने तक्रारीत केला.

त्या प्रकरणी हा खटला चालू होता. या प्रकरणात खंडपीठात खटला सुरु होता. मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, महिलेने केवळ तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले होते. परंतु तिच्या तक्रारीत अशा कोणत्याही विशिष्ट कृतीचा उल्लेख केलेला नाही.

याप्रकरणी न्यायालयाने म्हटले आहे की, जर एखाद्या विवाहित महिलेला कुटुंबासाठी घरगुती काम करण्यास सांगितले जात असेल तर त्याची तुलना घरातील नोकराच्या कामाशी करता येणार नाही. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार महिलेला घरातील कामे करण्यात स्वारस्य नसेल, तर तिने लग्नापूर्वी हे स्पष्ट केले पाहिजे, जेणेकरून पती-पत्नी बनण्यापूर्वी विवाहाचा पुनर्विचार करता येईल असेही म्हणण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: आता मुंबईला जाणारे दूध,भाजीपाला बंद करू; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा इशारा

Afghani Suit Designs: डेली वेअरसाठी 'हे' अफगाणी सूट आहेत बेस्ट चॉईस, एकदा नक्की ट्राय करा

Maharashtra Politics : अजित पवार गटाला मोठा झटका, बड्या नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश

Vishalgad Fort History: सह्याद्रीतील प्राचीन गड, जाणून घ्या विशालगड किल्ल्याची वास्तुकला आणि इतिहास

Tuesday Horoscope : हितशत्रूंचा धोका अन् अतिधनाचा मोह आवरा; ५ राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष काळजी

SCROLL FOR NEXT