Aurangabad News
Aurangabad News Saam Tv
महाराष्ट्र

औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी 5 दिवस बंद, पुरातत्व विभागाचा निर्णय

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: औरंगाबादच्या (Aurangabad) खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू असतानाच ही कबर पर्यटकांसाठी (tourists) पुढील ५ दिवस बंद राहणार आहे. औरंगजेब कबर समितीच्या मागणीनंतर पुरातत्व विभागाने (Archeology Department) हा निर्णय घेतला आहे. औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना एमआयएमचे (MIM) नेते, आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहत त्या ठिकाणी माथा टेकवला. त्यांच्या या कृतीचा शिवप्रेमी जनतेकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहेत.

हे देखील पाहा-

यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. वाद वाढत चालल्याने औरंगजेब कबर समितीने पुरातत्व विभागाकडे काही दिवस ही कबर बंद ठेवण्याची मागणी केली होती. यानंतर पुरातत्व विभागाने राज्यात सद्यस्थिती बघता पर्यटकांसाठी औरंगजेबाची कबर पुढील ५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यानंतर वातावरण बघून निर्णय घेतला जाणार आहे.

शिवसेना, भाजप, मनसेसह इतर हिंदुत्ववादी संघटनांनी यावरती मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला जात आहे. क्रूर मुघल बादशहाने महाराष्ट्राचे एवढे नुकसान केल्यानंतर देखील त्याच्या कबरीसमोर कुणी नतमस्तक कसे होऊ शकते, असा प्रश्न करत ओवैसींच्या कृत्याचा निषेध केला गेला. यावरून भाजप आणि मनसेने महाविकास आघाडीला घेरण्याचाही प्रयत्न केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer : लोकल गर्दीमुळे आणखी किती रियांचे बळी जाणार? डोंबिवली ते कोपरदरम्यानच अपघात का?

MI Vs LSG : लखनौच्या गोलंदाजांसमोर मुंबईचा संघ गडगडला; लखनौसमोर १४५ धावांचं लक्ष्य

Modi VS Pawar | राजकारणातील भटकती आत्मा कोण? मोदी-पवारांमध्ये जुंपली

Today's Marathi News Live : ठाण्याच्या जागेचा मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य, प्रताप सरनाईक

Arvind Kejriwal: निवडणुकीपूर्वी केजरीवालांना अटक का? कोर्टाने ईडीला विचारले हे 5 प्रश्न

SCROLL FOR NEXT