औरंगाबाद मध्ये हल्लेखोरांचा हैदोस; घटना CCTV मध्ये कैद डॉ. माधव सावरगावे
महाराष्ट्र

औरंगाबाद मध्ये हल्लेखोरांचा हैदोस; घटना CCTV मध्ये कैद

पुणे शहरात जाण्यासाठी नातेवाइकांना ट्रॅव्हल्स बसममध्ये बसवून कारने घरी परतणाऱ्या तरुणाला दुचाकीस्वार ३ तरुणांनी अडवून दगडाने मारहाण

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : पुणे शहरात जाण्यासाठी नातेवाइकांना ट्रॅव्हल्स बसममध्ये बसवून कारने घरी परतणाऱ्या तरुणाला दुचाकीस्वार ३ तरुणांनी अडवून दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. जखमी तरुणावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना १३ सप्टेंबर दिवशी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास अदालत रोडवरील सतीश मोटर्सजवळ घडली आहे. राधेयवर दगडाने हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हल्लेखोरही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहेत. या घटनेला ३ दिवस उलटले, तरी पोलिसांनी ना गुन्हा दाखल केला, ना आरोपींना अटक करण्यात आली. राधेय भगवान जोशी असे जखमी तरुणाचे नाव आहे. या घटनेविषयी मिळालेली माहिती अशी की, राधेय यांच्या घरी महालक्ष्मी सणासाठी पुणे येथील नातेवाईक आले होते.

हे देखील पहा-

१३ सप्टेंबर दिवशी रात्री १०.४० वाजता पुणेला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसमध्ये नातेवाइकांना बसवून देण्यासाठी राधेय कार घेऊन अदालत रोडवरील ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयाजवळ कारने गेला होता. त्याठिकाणी त्याने नातेवाइकांना बसमध्ये बसवून, तो यू- टर्न घेऊन कारने घरी जाऊ लागला. तेव्हा वळणावर ट्रिपलसीट दुचाकीस्वार वेगात आले आणि त्यांनी राधेय ला शिवीगाळ करून कार थांबविण्यास सांगितली.

यावेळी त्याने उभी केली आणि तो कारमधून उतरला. माझी चूक नसताना, तुम्ही का शिव्या देता, असे त्याने विचारताच, ३ अनोळखी तरुणांपैकी एकाने त्याच्या कानाखाली मारली, तर दुसऱ्याने दगड उचलून त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी राधेयने त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघेही त्याला दगड मारत होते. यावेळी राधेय जीव वाचविण्यासाठी कंपनीच्या पळत ट्रॅव्हल्स कार्यालयाकडे गेला.

हल्लेखोर तेथेही त्याच्या मागे आले. यावेळी त्यांनी त्याला तेथून ओढत बाहेर नेले आणि त्यांच्यापैकी एकाने एक दगड डोक्यात मारून, त्याला रक्तबंबाळ केले आहे. यामुळे त्याला भोवळ आली. यावेळी एक जणाने मध्यस्थी करत आरोपींना तेथून जाण्याचे सांगितले. यानंतर जखमी तरुणाला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या डोक्यावर ७ ते ८ टाके देण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

Attack On Shiv Sena Leader: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT