औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) शहरात नीट (NEET) परीक्षेची तयारी करण्यासाठी निघालेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांवर काळाने घाला घातला आहे. दुचाकीवरुन भरधाव वेगाने निघालेल्या दोन युवक ट्रकला पाठीमागून जोरदार धडकल्याने त्यांचा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की हे दोन्ही युवक जागीच ठार झाले.
औरंगाबाद - पुणे महामार्गावरील (Aurangabad - Pune Highway) भेंडाळा फाट्याजवळ हा बुधवारी हा भीषण अपघात झाला असून या अपघातात यश नयन शेंगुळे वय वर्ष १९ आणि आदित्य रामनाथ सुव वय वर्ष १९ अशी मृत विद्याथ्यांची नावे आहेत. हे दोघेही गंगापूर तालुक्याचे रहिवासी होते.
पाहा व्हिडीओ -
यश व आदित्य हे दोघे वर्गमित्र होते. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 'नीट'च्या रिपीट बॅचमध्ये तयारीसाठी त्यांनी औरंगाबादला क्लास लावला होता. गावाकडून दुचाकीवर (एमएच २० ईएक्स ६०४८) निघाले असताना औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रकला (केए ५६-४१२३) पाठीमागून त्यांची दुचाकी धडकली. यात दोघांच्या डोक्यास गंभीर इजा झाली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.