Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: ट्रकची दुचाकीला मागून धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले; एकाच कुटुंबातील तीघांचा मृत्यू

माधव सावरगावे, औरंगाबाद

औरंगाबाद : वाळूज महानगरमध्ये भीषण अपघात झाला. एनआरबी चौकात झालेल्‍या अपघातात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक देत दुचाकीस्वारास चिरडले. या (Accident) अपघातात एकाच कुटुंबातील तीघांचा मृत्यू (Accident Death) झाला असून मृतात तीनही भावंडांचा समावेश आहे. (Tajya Batmya)

औरंगाबादच्या (Aurangabad) वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव फाट्याजवळ मॅन डिझेल कंपनी समोर हा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी भाऊ व दोन बहिणी मोटारसायकल (क्र. MH 21, AM 6995) कामाला जात होते. दरम्‍यान रस्‍त्‍यावरच भरधाव वेगात येत असलेल्‍या ट्रकने मागून जोरदार धडक दिली.

तिघांचा जागेवरच मृत्‍यू

कामावर जाणाऱ्या भाऊ बहिणीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक देत चिरडले. यात भावासहीत दोन बहिणींचा जागेवरच मृत्यू झाला. दीपक कचरू लोखंडे (वय १८), अनिता लोखंडे (वय २०) व निकिता लोखंडे (वय २२) यांचा मृत्यू झाला. हे तिघेही सर्व राहणार रांजणगाव शेणपुंजी येथील होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Lung cancer: तरूणांच्या शरीरात गपचूप घर करतो फु्फ्फुसांचा कॅन्सर; सुरुवातीची 5 लक्षणं वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: जांभळी साडी, नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर; वैदेही परशुरामीचा मराठमोळा अंदाज

"चंद्रकांत पाटलांना नोबेल पुरस्कार द्या"; चंद्रकांत पाटलांच्या फिंगरप्रिंट विधानावर संजय राऊतांचा खोचक टोला

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! 20% DA वाढ, या महिन्यापासून खात्यात जमा होणार पगार

SCROLL FOR NEXT