Gautami Patil Viral Video Saam Tv
महाराष्ट्र

Gautami Patil : गौतमीला पाहण्यासाठी चाहत्यांना शॉक लागण्याचीही पर्वा नाही, थेट खांबावर चढले अन्...

Gautami Patil Viral Video : गौतमी पाटील आणि राडा हे समीकरण आता ठरलेलंच दिसतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजय सोनवणे

Lavani Dancer Gautami Patil News : लावणी डान्सर गौतमी पाटील ही कायमच चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमाला होणारी मोठी गर्दी आणि त्यामधील वाद ही काही नवी बाब राहिलेली नाही. असाच एक प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. गौतमी पाटील हिच्या नाशिकच्या निफाडमध्ये येथील कार्यक्रमात तुफान राडा झाला. (Latest Marathi News)

गौतमी पाटील आणि राडा हे समीकरण आता ठरलेलंच दिसतं. जिथे जिथे गौतमीचा कार्यक्रम होतो, तिथे राडा होतोच. काल नाशिकच्या (Nashik) निफाडमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली होती.

गौतमीच्या अदा पाहण्यासाठी चाहते इतके उतावीळ झाले की ते थेट मार्केट शेडच्या खांबावर चढले. या खांबांवर लाईट देखील असल्याने त्याचा शॉक लागेल याची परवा देखील प्रेक्षक करत नव्हते. त्यामुळे अखेर गौतमी पाटील हिने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अर्धा तास आधीच कार्यक्रम गुंडाळण्याचा निर्णय घेतला. गौतमीच्या कार्यक्रमात हे पहिल्यांदाच घडलं.

गौतमी पाटील येणार म्हणून या कार्यक्रमाला तुफ्फान गर्दी झाली होती. प्रेक्षकांना पाय ठेवायलाही जागा नव्हती, एवढी प्रचंड गर्दी या कार्यक्रमाला झाली होती. काही युवकांनी हुल्लडबाजी करत लावलेल्या बॅरिकेट्स तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला.

तर काहींनी खुर्च्या देखील तोडफोड केल्या. प्रेक्षकांना आवरणे कठीण होत असल्याने पोलिसांना अक्षरशा त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज करण्याची वेळ आली. सर्व परिस्थिती बघता गौतमी पाटीलचा कार्यक्रम अर्धा तास अगोदरच संपवण्याची वेळ आयोजकांवर आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT