Action will be taken against the culprits: Home Minister Walse-Patil
Action will be taken against the culprits: Home Minister Walse-Patil Saam Tv
महाराष्ट्र

राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न; दोषींवर कारवाई करणार: गृहमंत्री वळसे-पाटील

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर: राज्यात सामाजिक तणाव निर्माण करुन अशांतता निर्माण केली जात असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या गोपनीय अहवालानुसार राज्यात अशांतता निर्माण करण्याच्या हालचाली सुरु आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस सज्ज असून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल तसेच दोषींवर कारवाई केली जाईल असं गृहमंत्री म्हणाले. तसेच केंद्र सरकार दोषींना सुरक्षा पुरवतंय असा आरोप त्यांनी करत हा राज्याच्या अधिकारांवर गदा आहे असा टोला वळसे-पाटलांनी लगावला आहे. (Attempts to create unrest in the state; Action will be taken against the culprits: Home Minister Walse-Patil)

हे देखील पहा -

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्याच्या पोलीस महासंचालक यांना सूचना दिल्या आहेत. त्या-त्या शहरातील पोलीस आयुक्तांसोबत बैठक घेतली जात आहे, त्यांनतर त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. आम्ही पूर्ण तयारीत आहोत, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेऊ. कुठल्याही वक्तव्यामुळे आणि बोलण्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर कारवाई केली जाते. काही घटकांकडून अशांतता निर्माण होईल असे प्रयत्न होतायत. देशात आणि राज्यातही सर्व पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्या जाईल. सर्वांशी चर्चा केली जात आहे असं वळसे-पाटील म्हणाले.

अमरावतीमध्ये काही घटना घडतात याचा अर्थ त्या ठिकाणी काही असामाजिक तत्वं तिथे काम करत आहेत, त्यांचा बंदोबस्त लावण्याची गरज आहे असं गृहमंत्री म्हणाले. आपल्या देशात वेगवेगळ्या कारणांवरून जातीत भावना भडकविण्यासंदर्भात प्रयत्न होतोय, अशांतता निर्माण केली जात आहे. इतर प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय अस आरोप त्यांनी केंद्रावर केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT