हृदयद्रावक! जन्मदात्रीवरच लेकाचा अत्याचार संजय राठोड
महाराष्ट्र

हृदयद्रावक! जन्मदात्रीवरच लेकाचा अत्याचार

पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ - जिल्ह्यातील वणी पोलीस स्टेशन Police Station अंतर्गत येणाऱ्या ब्राह्मणी Brahmani येथे पोटाच्या गोळानेच जन्मदात्री आईवर अत्याचार केल्याची खळखळ जनक घटना उघडकीस आली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहेत. या प्रकरणी नराधम आरोपीला अटक Accused Arrested करण्यात आली आहे.

नराधम मुलगा हा आईसह ब्राह्मणी परिसरात राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. २३ जुलै २०२१ रोजी मुलगा कामावरून घरी आला आणि झोपी गेला. दरम्यान घरी त्याची आई एकटीच होती. मध्यरात्री मुलाच्या मनात विकृती जागी झाली अन् त्याने आईसोबत बळजबरी करीत अत्याचार केला. आपल्या जन्मदात्या मुलाकडून असे विकृत कृत्य झाल्याचे आईला सहन होत नव्हते. घटनेच्या काही वेळेनंतर तिने विष प्राषण करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हे देखील पहा -

वणीतील एका खासगी रुग्णालयात पिडीत आईला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आईवर सध्या उपचार सुरू आहे. मात्र आपल्याच पोटच्या मुलाने केलेले हैवानी कृत्य आईच्या डोक्यातून जात नव्हते. अखेर तिने पोलिसांत तक्रार देण्याचा निश्चय केला. पीडित आईने काल पोलीस स्टेशन गाठत याबाबत माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नराधम मुलावर अत्याचार केल्या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय अरुण नाकतोडे घटनेचा पुढील तपास करणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावणात ३ ग्रह करणार गोचर; 'या' राशी होणार मालामाल

Ashok Saraf Age: अशोक सराफ यांचे खरं वय किती?

Nitanshi Goel: 'लापता लेडीज'मधील 'फूल'चा ऑफ-शोल्डर गाऊन लूक पाहिलात का?

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

Mumbai Monorail : मुंबईत मोनो रेल अडीच तासांपासून विस्कळीत; तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल|VIDEO

SCROLL FOR NEXT