Attempt of self-immolation of cleaning staff in front of Nagpur Collectorate संजय डाफ
महाराष्ट्र

Nagpur: नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सफाई कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न...

Nagpur News: याबाबत पोलिसांनी या व्यक्तीला कलम 149 अंतर्गत नोटीस दिली होती.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर: नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका कर्मचाऱ्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. विनोद नंदकिशोर मेहरोलिया असं आत्मदहनाचा (self-immolation) प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव असून हा व्यक्ती नवीन कामठी, येरखेडा येथील अन्नधान्य पुरवठा विभागात सफाई कामगार (cleaning staff) म्हणून कार्यरत आहे. (Attempt of self-immolation of cleaning staff in front of Nagpur Collectorate)

हे देखील पहा -

मिळालेल्या माहितीनुसार या सफाई कर्मचाऱ्याची स्थायी नियुक्ती (Permanent appointment) आणि वेतन वृद्धी (salary hike) न झाल्याने त्याने याआधीच आत्मदहन करण्याचा इशारा पालिका प्रशासनाला दिला होता. याबाबत पोलिसांनी या व्यक्तीला कलम 149 अंतर्गत नोटीस दिली होती. मात्र तरीही या सफाई कर्मचाऱ्याने आज (२४ मार्च) सकाळी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Office of District Collector, Nagpur) स्वतःच्याच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तातील पोलिसांनी लागलीच त्याला ताब्यात घेतल्यानं अनर्थ टळला, मात्र हा कर्मचारी अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangmeshwar Amba Ghat : संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर दरड कोसळली, वाहतूक पूर्णत: ठप्प; कोकणात जाणाऱ्यांचे हाल

Viral Video: आधी कानाखाली मारली नंतर उचलून आपटल; उधारीवरून ग्राहक अन् दुकानदाराचं भांडण पेटलं, Video व्हायरल

Maharashtra Live Update: पुण्यातील बॉलर पबवर गुन्हा दाखल

Raj Kundra Video: "माझी एक किडनी तुमच्या नावावर..."; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचं वचन, प्रेमानंद महाराज भावुक

Pandharpur News: तिरंगा रंगात रंगले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT