Balaji Kalyankar Saam Tv
महाराष्ट्र

Nanded News : शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडली; अर्धापूरमधील घटना

Balaji Kalyankar Car Break : बालाजी कल्याणकर हे एका लग्न समारंभासाठी देगाव कुराडा येथे गेले होते. तिथे ही घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी | नांदेड

Nanded News :

नांदेड उत्तरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडल्याची घटना समोर आली आहे. अर्धापूर तालुक्यातील देवाग कुराडा या गावात काही तरुणांनी आमदार कल्याणकर यांची गाडी फोडली. बालाजी कल्याणकर हे एका लग्न समारंभासाठी देगाव कुराडा येथे गाडी पार्किंग मध्ये लाऊन ते लग्न कार्यात गेले होते, त्यावेळी ही घटना घडली आहे. मराठा आंदोलकानी त्यांची गाडी फोडल्याचं सांगण्यातं येत आहे.

बालाजी कल्याणकर आपली कार कार्यक्रम स्थळाजवळ पार्क केली होती आणि ते कार्यक्रमात गेले होते. मात्र काही वेळातच त्यांच्या गाडीवर दगड फेकून त्यांच्या कारची मागची काच फोडण्यात आली. मराठा आंदोलकानी आमदारांच्या कारची काच फोडल्याचं बोललं जात आहे. मात्र या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच काही वेळात पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले.

सध्या लग्न सराई सुरू आहे.नेते मंडळी देखील आप आपल्या नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी जात आहेत.परंतु मराठा आरक्षणावर अद्याप निर्णय झाला नाहीय. सरकारने दिलेले आरक्षण हे फसवे असल्याचा आरोप मराठा समाज करत आहेत. सगेसोयरे याची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशी सकल मराठा समाजाची मागणी आहे.परंतु सरकारने मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले.त्यामुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक होताना पाहावयास मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजने गावा गावातून उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.त्याच राजकीय नेत्यांना देखील मराठा आरक्षणा साठी लक्ष केलं जातं आहे.शिंदे गटाचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा या गावी एका लग्न समारंभासाठी गेले होते.गाडी पार्किंग मध्ये लाऊन कल्याणकर लग्न लावण्यासाठी गेले असता मराठा तरुणींनी त्यांची गाडी फोडल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT