ATS Action  Saam Digital
महाराष्ट्र

Akola: अकोल्यात दोन बांगलादेशी घुसखोरांच्या आवळल्या मुसक्या? एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ATS And MIDC Police Station: एटीएस आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत दोन बांगलादेशी इसमांना ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणी संपूर्ण पडताळणी केल्याअंती एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Dhanshri Shintre

अकोल्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एका परिसरात दोन बांगलादेशी इसम अनधिकृतरित्या वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळताच एटीएस आणि एमआयडीसी यांनी संयुक्त कारवाई करीत त्यांच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती प्राप्त असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

राज्यात बांगलादेशी इसम मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या वास्तव्य करीत असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे ड्राईव्ह राबविण्याचे निर्देश नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सदर निर्देशानुसार राज्यातील गुप्त यंत्रणा, जिल्हा एटीएस कामाला लागले असून त्यांनी कुंडली गोळा करण्यास सुरुवात केली.

या मोहिमेत जिल्हा एटीएसला मोठे यश मिळाले असून शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या परिसरात दोन बांगलादेशी इसम राहत असल्याची खात्री होताच जिल्हा एटीएस आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत दोन बांगलादेशी इसमांना ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणी संपूर्ण पडताळणी केल्याअंती एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मनी शंकर निशिकांत बिश्वास (वय 27 वर्ष) आणि निर्मल उर्फ नयन निशिकांत बिश्वास (वय 25 वर्ष) या दोघांची नावे आहे. शंकर हा अकोला एमआयडीसीत एन पाटकर कन्स्ट्रक्शन कंपनीत मजुरी करीत होता. आणि तो गोहा काचर ता. गफिनायपुर जि. गोपालगंज बांगलादेश येथील आहे. तर नयन हा पवार अँड पाटकर कंट्रक्शन कंपनीत मजुरी करायचा, तो मूळ गोहाकाचर ता. गपिनायपूर जिल्हा - गोपालगंज बांगलादेश येथील आहे. त्यांच्याकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी, कोविड कार्डसह अन्य साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, ही कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वैशालीमुळे यांनी केली.

सदर प्रकरणी केलेल्या कारवाईची मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात आली असून सदर कारवाई बाबत कोणीही काही बोलण्यास तयार नाही. तर शहरात अजून काही ठिकाणी अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेले बांगलादेशी इसम यंत्रणेच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Infertility treatment: गर्भधारणेमध्ये अडथळा येत असलेल्या महिलांसाठी 'ही' थेरेपी ठरेल आशेचा किरण; पाहा काय आहे ही थेरेपी?

Denver Airport Incident : १७३ प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानाच्या लँडिंग गियरला आग, अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली | Video

SCROLL FOR NEXT