nandurbar crime news, atm, nashik, police, arrests saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : 1 कोटी 5 लाख रुपये चाेरल्याप्रकरणी नाशकातून एकास अटक, नंदूरबार पाेलिसांची कारवाई

या गुन्ह्याचा कसून तपास नंदूरबार शहर पाेलिस करीत आहेत.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar Crime News : एक कोटी पाच लाखाच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या संशयिताचा छडा लावण्यात नंदुरबार शहर पोलिसांना यश आले आहे. पाेलिसांनी राकेश चौधरी या संशयितास अवघ्या 48 तासांच्या आत जेरबंद केले आहे. या प्रकरणी पाेलिस राकेश चाैधरी याची कसून चाैकशी करीत आहेत. (Maharashtra News)

बॅंकेच्या एटीएम केंद्रांत पैशांचा पुरवठा करणा-या व्हॅन मधील 1 कोटी पाच लाखांची रक्कम चाेरीस गेली हाेती. या घटनेनंतर नंदुरबार शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली हाेती. पाेलिसांनी विविध पथकांची नियुक्ती करुन प्रकरणाचा तपास सुरु केला.

अवघ्या 48 तासांत पाेलिसांनी राकेश चाैधरी या संशयितास नाशिक येथून अटक केली. त्याच्याकडून 50 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. आज दुपारी संशयित चाैधरी यास नंदूरबार येथे आणण्यात येईल अशी माहिती पाेलिसांनी दिली.

आता उर्वरीत 55 लाखांची रक्कम कुठे गेली याचा छडा लावण पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. चाैधरी यास या प्रकरणात आणखी कोणी मदत केली याचा उलगडा पोलिस तपासानंतर हाेईल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea on empty stomach: सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिता? शरीराला होऊ शकतात ‘हे’ त्रास, आजच बदला तुमची ही सवय

Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याचा लाभ कुणाला मिळणार? कोणत्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो?

मुग, मटकी, वटाणा... कडधान्य १ महिना खाल्ली नाहीत तर शरीरावर काय परिणाम होईल?

Shiv Sena Dispute: पक्षाची रचना आम्ही ठरवू, 'मुख्य नेता हे पद आलं कुठून?' कपिल सिब्बलांचा आक्रमक युक्तीवाद,आज कोर्टात काय-काय घडलं?

SCROLL FOR NEXT