Vanchit Bahujan Aaghadi Assembly Election  
महाराष्ट्र

Assembly Election: वंचितची आघाडी!; निवडणुका जाहीर होण्याआधीच पहिली यादी जाहीर,११ उमेदवारांची घोषणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिरा ढाकणे, साम प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. सर्व पक्ष जोरदार तयारीला लागलेत. मतदारासंघांसह जागावाटपाची चाचपणीही केली जातेय. वंचित बहुजन आघाडीही तयारीला लागली असून त्यांनी आघाडी घेत विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय.

Vanchit Bahujan Aghadi

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत ११ जणांची घोषणा करण्यात आली. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. वंचितकडून राज्यातील ११ जागांवर उमेदवार दिलेत. यात रावेर, नागपूर दक्षिण मध्य, वाशिम, शिंदखेड राजा, शेवगाव, नांदेड दक्षिण या जागांचा समावेश आहे.

यावेळी बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले, दोन बौद्धांव्यतिरिक्त, धीवर, लोहार, वडार, मुस्लीम या वंचित जाती समूहांना प्रतिनिधी देखील पहिल्या यादीत दिले आहे. येत्या काही दिवसांत दुसरी यादी जाहीर करण्यात येईल. आणखी काही पक्ष लवकरच आमच्या आघाडीत सामील होतील. आदिवासी मतदारसंघातूनच आदिवासींनी लढले पाहिजे.

ही मानसिकता येथील राजकारण्यांनी केली होती. ती आम्ही या निवडणुकीत मोडत आहोत. आदिवासी समाजातील उमेदवार हा सर्वसाधारण जागेवर सुद्धा लढू शकतो, यासाठी आम्ही सुरुवात केली आहे. संयुक्त जाहीरनामा आणि वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा निवडणुकीची सूचना येण्याआधीच आम्ही प्रसिद्ध करणार असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.

उमेदवारांची नावे

रावेर – शमिभा पाटील

शिंदखेड राजा – सविता मुंढे

वाशिम – मेघा किरण डोंगरे

धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा

नागपूर दक्षिण मध्य – विनय भागणे

साकोली – डॉ. अविनाश नान्हे

नांदेड दक्षिण- फारुख अहमद

लोहा – शिवा नारांगले

औरंगाबाद पूर्व- विकास रावसाहेब दांडगे

शेवगाव – किसन चव्हाण

खानापूर – संग्राम कृष्णा माने

विशेष म्हणजे वंचितने रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवाराला रिंगणात उतरवलंय. शमिभा पाटील असे वंचितच्या रावेर मतदारसंघातून लढणाऱ्या उमेदवाराचे नाव आहे. शमिभा भानुदास पाटील या एक मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक संस्थापक आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या मागणीने अजितदादांचं घड्याळ जाणार ?

Maharashtra Politics : वरळीत रंगणार ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना? आदित्य यांच्या विरोधात काका राज ठाकरे कोणती खेळी खेळणार? पाहा व्हिडिओ

Wai:वाई मार्गे सातारा जाणं ठरेल भारी; घडेल दक्षिण काशीचं दर्शन

Amir Khan : आमिर खान घेणार शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी पुढाकार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात साधला संवाद

Pimpri News : पिंपरीत भाजपचा राष्ट्रवादीला उघड विरोध

SCROLL FOR NEXT