Pimpri News : पिंपरीत भाजपचा राष्ट्रवादीला उघड विरोध

Assembly Election : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रचार करायचा नाही असा ठराव पिंपरीत भाजपने केला आहे. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रचार करायचा नाही असा ठराव भाजपने केला आहे. स्थानिक भाजप नेत्यांनी आमदार अण्णा बनसोडे यांना हा विरोध दर्शवला आहे. लोकसभेला भाजपचा उमेदवार मिळाला नाही. आता विधानसभेत भाजपचाच उमेदवार हवा, अशी आग्रही भूमिका भाजपच्या बैठकीत मांडण्यात आली आहे. भाजप विधानपरिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखेंच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित ही राष्ट्रवादीबद्दलची नाराजी दर्शवण्यात आली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या पिंपरीत विधानसभेचा अण्णा बनसोडेंचा प्रचार करणार नसल्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातला वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजपने पिंपरीच्या जागेवर दावा सांगितला आहे. त्याबद्दल भाजपचे स्थानिक नेते वरिष्ठांना मागणी करणार आहेत. तर आम्ही भोसरी आणि चिंचवड मागणार असल्याचा पलटवार अण्णा बनसोडेंनी केला आहे. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com