Amir Khan : आमिर खान घेणार शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी पुढाकार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात साधला संवाद

Amir Khan Visit Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University : बॉलीवूडचा स्टार अभिनेता आमिर खानने आज अकोल्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला भेट दिली.
Amir Khan
Amir KhanSaam Digital
Published On

बॉलीवूड स्टार आणि 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अभिनेता आमिर खाने आज अकोल्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला भेट दिली. त्यांनी विविध प्रक्षेत्रांना भेटी देत शेतीतील नवे तंत्रज्ञान जाणून घेतलं. यावेळी त्यांनी पाणी फाउंडेशन चळवळीत योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं ते म्हटल आहे. गुलाबी कलरचा कुर्ता आणि डोक्यावर गांधी टोपी अशा पेहरावात आमिरने शेतकरी आणि शास्त्रज्ञांची संवाद साधला.

आमिर खान यांनी आपल्या भाषणात त्यांनी कोरोना काळात सोयाबीन उत्पादन वाढीसाठी 'पाणी फाऊंडेशन'च्या शेतीशाळेचा प्रवास उलगडला. सोयाबीनपासून सुरू झालेला प्रवास आता 26 पिकांच्या उत्पादन वाढीच्या शेतीशाळांपर्यंत गेल्याचं ते म्हणालेय. दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं ते म्हटले. भविष्यात आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून या कामात पुढाकार घेणार असल्याचं ते म्हणालेय. आमिर खान हे त्यांच्या अभिनयासह त्यांच्यातील संवेदनशीलपणासाठी ओळखले जातात. अभिनेत्यापलिकडचा संवेदनशील माणूस आज अकोल्यात शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांना पहायला मिळाला.

जागतिक हवामान बदल आणि व्यावसायिक स्पर्धेच्या काळात अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक पद्धती, कृषिमाल प्रक्रियेसह विपणन क्षेत्रातील अद्ययावत माहिती शेतकऱ्यांपुढे मांडण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात तीन दिवसीय खर खरीप शिवार फेरी आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त आज अभिनेते आमिर खान शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Amir Khan
Ghodbunder Road Traffic : घोडबंदर रोड वाहतूक कोंडीच्या सापळ्यातून मुक्त होणार; कसा आहे प्लान? वाचा सविस्तर

व्यावसायिक शेती आणि त्यावर आधारीत तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवगत करणे काळाची गरज बनली आहे. त्याच्या प्रत्यक्ष वापरातून शेतकऱ्यांना स्वत:चा विकास साधता येतो. विद्यापीठाद्वारे आयोजित शिवार फेरीला २० सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजतापासून सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.

Amir Khan
Special Story : 'लाडक्या बहिणीं'साठी राज्य सरकारांची स्पर्धा; कोणत्या राज्यात किती दिले जातात पैसे? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com