महाराष्ट्र

Assembly Election: महायुतीत बंडाचा झेंडा, उल्हासनगरमध्ये अजित पवार गटाच्या नेत्यानंच भाजप उमेदवाराविरोधात भरला अर्ज

Ulhasnagar Constituency : उल्हासनगर मतदार संघात महायुतीची डोकेदुखी वाढलीय. भाजपचे उमेदवाराला अजित पवार गट राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानेच आव्हान दिल्याने महायुतीत बिघाडी झालीय.

Bharat Jadhav

उल्हासनगर मतदार संघात महायुतीत बिघाडी झाली आहे. महायुतीतील मित्र पक्षातील पदाधिकारीच भाजपची डोकेदुखी वाढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उल्हासनगर शहराध्यक्ष भरत गंगोत्री आज महायुतील भाजपचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या विरोधात फॉर्म आज भरला.

उल्हासनगर येथील गोल मैदानापासून प्रांत कार्यालयापर्यंत जोरदार शक्ती प्रदर्शन करत गंगोत्री यांनी आपला अर्ज भरला. भरत गंगोत्री उल्हासनगर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून मुख्य दावेदार होते. मात्र भाजपचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांना भाजपने दुसऱ्या यादीत उमेदवारी जाहीर केली होती. ही जागा भाजपला गेल्यानं राष्ट्रवादीचे पदाधिकारी गंगोत्री नाराज होते. त्यामुळे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.

आम्हाला उल्हासनगरचा विकास करायचा आहे, विकास न झाल्याने विद्यमान आमदारांचा सर्वे निगेटिव्ह केला होता. 'चेहरा बदलो उल्हासनगर बदलो' याप्रमाणे मी शहराच्या विकासासाठी निवडणुकीचा अर्ज भरला आहे असं मत भरत गंगोत्री यांनी व्यक्त केला. दरम्यान १० एप्रिल रोजी भरत गंगोत्री यांची राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भरत गंगोत्री यांची उल्हासनगर जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती केली होती. पक्षाचे कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे यांच्या हस्ते गंगोत्री यांना नियुक्तीपत्र दिलं होतं.

उल्हासनगर शहर उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ मतदारसंघात विभागले आहे. शहर पूर्वचा बहुतांश भाग अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात येतो. तर उर्वरित भाग कल्याण पूर्व मतदारसंघात येतो. येथे चौरंगी लढत होणार असतानाच महायुतीत दुफळी निर्माण झालीय. दरम्यान येथे मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे ओमी कलानी आणि कुमार आयलानी यांच्यात होणार आहे.

कुमार आयलानी यांनी सन-२००९ मध्ये पप्पु कलानी यांचा पराभव केला. तर सन-२०१४ साली ज्योती कलानी यांनी कुमार आयलानी यांचा पराभव करत पतीच्या पराभवाचा वचपा काढला होता. मात्र २०१९ साली ज्योती कलानी ह्या आयलानीकडून पराभूत झाल्या.

दरम्यान उल्हासनगर विधानसभेत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी अशी चौरंगी लढत अपेक्षित आहे. याआधी कलानी कुटुंबातून ओमी कलानी यांचे वडील पप्पू कलानी यांनी चारवेळा, तर दिवंगत ज्योती कलानी यांनी एकदा आमदार पद भूषवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Married Women: लग्न झालेल्या महिला पायात जोडवी का घालतात? जाणून घ्या कारण...

Dheeraj Deshmukh: धीरज देशमुखांच्या पराभवानंतर कार्यकर्ते ढसाढसा रडले, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: भाजप प्रदेश कार्यालयात जिल्हाध्यक्षांची बैठक सुरु

IPL Mega Auction 2025 Live News: आज किती खेळाडूंचं नशीब चमकणार; कोणावर लागणार कोटींची बोली?

IND vs AUS 1st Test: भारताचा पर्थमध्ये एकतर्फी विजय! बुमराह, जयस्वालसह हे खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार

SCROLL FOR NEXT