Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election : मविआने पाटणमध्ये ताकद लावली, देसाई विरुद्ध पाटणकर संघर्ष?

Siddhi Hande

शिंदे गटाचे हेवी वेट मंत्री शंभुराज देसाईंच्या पाटण मतदारसंघात त्यांना ठाकरे गट आणि पवारांनी आव्हान दिलंय. मात्र पाटणचं समीकरण नेमकं कसं आहे? चला तर मग जाणून घेऊया.

पाटणमध्ये रंगणार पारंपरिक लढत?

विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं नसतानाच जयंत पाटलांनी सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघासाठी मंत्री शंभुराज देसाईंच्या विरोधात सत्यजित पाटणकरांची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. तर सत्यजित पाटणकरांनीही शंभुराज देसाईंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना पराभूत करण्याचा चंगच बांधलाय. मात्र दुसरीकडे ठाकरे गटाचे हर्षद कदम यांनीही पाटणवर दावा सांगितलाय.

२०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोन वेळा शिवसेनेच्या शंभुराज देसाईंनी राष्ट्रवादीच्या सत्यजित पाटणकरांचा पराभव केला.राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती सरकाच्या काळात मंत्रिपद असल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकासनिधी मतदारसंघात आणला.मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर पाटण विधानसभा मतदारसंघाचं समीकरण बदललंय.. तर फुटीनंतर शंभुराज देसाईंनी ठाकरेंना थेटपणे अंगावर घेण्याचं काम केलंय. त्यामुळे शंभुराज देसाईंना घेरण्याची योजना पवार आणि ठाकरेंनी केलीय.

2019 चं समीकरण कसं होतं?

शंभुराज देसाई, मंत्री, शिंदे गट- 1 लाख 6 हजार 266 मतं

सत्यजित पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेस- 92 हजार 91 मतं

14 हजार मतांनी देसाईंचा विजय

लोकसभा निवडणूकीत पाटण मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेंना 2 हजार 900 मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे शंभुराज देसाईंची धाकधूक वाढली आहे. मात्र पवारांनी उमेदवार घोषित केला असला तरी ठाकरे गटाने पाटणवर दावा सांगितल्याने बंडखोरी झाल्यास ती देसाईंच्या पथ्यावर पडण्याची शक्यता अधिक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhishek- Aishwarya: अभिषेक- ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा? चर्चेतली अभिनेत्री कोण?

'Bigg Boss 18' च्या घरात वाहू लागले प्रेमाचे वारे, टीव्ही गाजवणाऱ्या स्टार्सची स्पेशल बॉन्डिंग

Maharashtra News Live Updates: अपक्ष आमदार देवेंद्र भुसार हे राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करण्याच्या वाटेवर

Nashik News: नाशिकमध्ये भाजपला भगदाड! नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह १५ नगरसेवकांचे राजीनामे, विधानसभेला सख्खे भाऊ भिडणार?

Kajal Apply Tips : काजळ लावल्यावर पसरतं? मग करा 'या' सोप्या ट्रिक्स फॉलो

SCROLL FOR NEXT