Dilip Walse Patil Saam TV
महाराष्ट्र

Dilip Walse Patil: 'हव्यासापोटी आपण वडीलधाऱ्यांना बाजूला करतो का?' दिलीप वळसेंचा विरोधकांना सवाल

Dilip Walse Patil Speech: मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव मतदार संघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रांताध्यक्ष सुनिल तटकरेही उपस्थित होते.

रोहिदास गाडगे

Ambegaon Assembly Election 2024: 'विरोधक म्हणतात मी सात वेळा आमदार झालो, आठव्यांदा कशाला? आता मला सांगा, घरातील वडीलधारी मंडळी किती ही मोठी झाली तर आपण त्यांना बाजूला करतो का? आपण त्यांचा सांभाळ करतोच. मात्र सत्तेच्या हव्यासापोटी ते असे आरोप करत आहेत.. असे म्हणत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी टिकाकारांना उत्तर दिले. आंबेगाव विधानसभेतून उमेदवारी अर्ज भरताना ते बोलत होते.

आंबेगावमधून उमेदवारी अर्ज दाखल

आजपासून विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव मतदार संघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रांताध्यक्ष सुनिल तटकरेही उपस्थित होते. अर्ज भरण्याआधी वळसे पाटील यांचे त्यांच्या निवासस्थानी औक्षण केले त्यासोबत परिसरातील प्रमुख देवतांचे दर्शन देखील घेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. अर्ज भरल्यानंतर झालेल्या मेळाव्यात बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले वळसे पाटील?

विरोधक म्हणतात मी सात वेळा आमदार झालो, आठव्यांदा कशाला? आता मला सांगा घरातील वडीलधारी मंडळी किती ही मोठी झाली तर आपण त्यांना बाजूला करतो का? आपण त्यांचा सांभाळ करतोच. मात्र सत्तेच्या हव्यासापोटी ते असे आरोप करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. तसेच यंदाच्या विधानसभेत परिस्थिती बदललेली आहे. मात्र माझ्या समोर कोणतंही आव्हान नाही, असा विश्वास दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केला.

दरम्यान, एकीकडे शरद पवारांचे वय झालंय, आता त्यांनी आम्हाला संधी द्यावी. वडील कधी न कधी मुलांच्या हातात कारभार देतातचं, असं अजित पवार वारंवार म्हणतात. आपल्या भाषणामध्ये ते नेहमीच शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करतात. अशातच दिलीप वळसेंनी विरोधात उभं राहणाऱ्यांना उद्देशून बोलताना मात्र हव्यासापोटी आपण वडीलधाऱ्यांना कधी बाजूला करतो का? असं वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पुन्हा सुरू होणार का? महत्त्वाची अपडेट आली समोर

IPL Winner Prize Money 2026: IPLच्या विजेत्या संघावर होणार पैशांचा पाऊस; रनर-अपला किती मिळेल पैसा?

Naga Chaitanya: नागा चैतन्यने समंथाचं करियर खराब केलं; अभिनेत्यावर गंभीर आरोप, प्रकरण थेट हायकोर्टात पोहोचलं

IT मॅनेजरचा जॉब सोडला अन् महिला झाली रिक्षाचालक, महिन्याची कमाई किती?

Thyroid Care Diet : थायरॉईड कायम राहिल कंट्रोलमध्ये, औषधांसोबतच रोज खा 'हे' सुपरफूड

SCROLL FOR NEXT