Ashwini Bidre Case Saam tv
महाराष्ट्र

Ashwini Bidre Case : अश्विनी बिद्रे प्रकरणाचा फैसला कधी होणार? महत्वाची माहिती आली समोर, सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं?

Ashwini Bidre Case update : अश्विनी बिद्रे प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणाचा फैसला २१ एप्रिल रोजी होणार आहे.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा फैसला २१ एप्रिल रोजी होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी अलिबाग आणि पनवेल सत्र न्यायालयात सुरु होती. त्यानंतर आज पनवेल सत्र न्यायालयाकडून प्रकरणात शिक्षा सुनावण्यात येणार होती. बिद्रे प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्याकडून आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार होती. मात्र, या प्रकरणाचा फैसला २१ एप्रिल रोजी ढकलण्यात आला आहे.

अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणातील आरोपींना आता २१ एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचं निश्तिच झालं आहे. कोर्टाने आज सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतला. यासोबतच अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांची बाजू जाणून घेतली. कोर्टाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवलाय.

बिद्रे प्रकरणाचा निकाल आता २१ एप्रिल रोजी जाहीर केला जाणार असल्याचे घोषित केले. कोर्टाने यावेळी हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं म्हटलं आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार आता आरोपी अभय कुरुंदकर याला 21 एप्रिलला शिक्षा सुनावली जाणार आहे.

अॅड प्रदीप घरत यांनी कोर्टात काय मागणी केली?

अॅड प्रदीप घरत म्हणाले की, '५० वर्षीय वयाच्या अधिकाऱ्याने त्याच्याच मुलांच्या वयाच्या मुलीची हत्या केली. पोलिसांना समाजात मान आणि विश्वास असतो. पण आरोपीने समाजाचा विश्वास घात केला आहे. आरोपींना मृत्यूदंड देण्याची मागणी केली. पोलिसांनी तपासात मोठा हलगर्जीपणा केलाय. बिद्रे प्रकरणातील अमूल्य पुरावा पोलिसांनी नष्ट केलाय. पोलीस कमिशनर हेमंत नगराळे यांनीही मदत केली आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT