Ashok Kharat faces fresh allegations as his name surfaces in the Shalarth ID scam controversy in Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभाग? धक्कादायक माहिती समोर; शिक्षण क्षेत्रात खळबळ

Ashok Kharat Shalarth ID Scam Details: अशोक खरात प्रकरणात नवा खुलासा समोर आला असून शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभाग असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Omkar Sonawane

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असताना आता शिक्षण विभागाशी संबंधित आणखी एक गंभीर मुद्दा समोर आला आहे. राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये देखील अशोक खरात असल्याचे समोर आले आहे. अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभाग असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, 2022 साली शिक्षणमंत्री दीपक केसरकर असताना यांच्या कार्यकाळात अशोक खरातने आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भोंदू बाबा अशोकचा भाऊ दिलीप खरात हा सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात शिक्षण विभागात अशीही चर्चा आहे की, तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मध्यस्थी करत हा आयडी मिळवून देण्यात आला. त्यामुळे दिलीप खरातचा शालार्थ आयडी खरा की बोगस, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय अशोक खरातने आपल्या राजकीय वजनाचा वापर करून शिक्षण विभागातील अनेक फाईल्स पास केल्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक खरात प्रकरणातील सर्व मंत्री-अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा, कुणी लिहलं राष्ट्रपतींना पत्र

Crime News: श्रद्धा वालकर हत्याकांडची पुनरावृत्ती; फ्रिजमध्ये सापडले मोनिकाच्या शरिराचे तुकडे, पोलीस शिराच्या शोधात

Shocking : नात्याला काळिमा! काकानं लेकीसारख्या मुलीवर केला बलात्कार, निर्जनस्थळी केलं अमानुष कृत्य

Home loan tips: होम लोन घेण्यापूर्वी या बाबींचा विचार नक्की करा

Cancer Symptoms: भूक लागत नाही अन् वजन अचानक कमी होतंय? असू शकतात या कॅन्सरची लक्षणं, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT