Fake godman Ashok Kharat during SIT investigation in Nashik as shocking details of exploitation emerge. Saam tv
महाराष्ट्र

दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए! महिलांचे लैंगिक शोषण कसे केले? खरात बाबाने सर्वच सांगितलं; SIT तपासातून धक्कादायक माहिती समोर

Ashok Kharat SIT Investigation Details Nashik: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SIT तपासातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

Omkar Sonawane

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याची नाशिकमध्ये SIT कडून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. महिलांचे लैंगिक शोषण केल्याची खरातने कबुली खरातने दिली आहे. महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रीक्सला विज्ञानाचे नाव दिल्याचे नाव समोर आले आहे. या काळ्या करनाम्यात खरातला इतर कोणाची मदत होती का? याचा तपास सुरू आहे.

महिलांचे शोषण कसे केले? अशोक खरातने दिली धक्कादायक माहिती

चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकवल्याची तसेच शोषन केल्याची कबुली अशोक खरातने दिली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. ज्या गोष्टींना लोक चमत्कार आणि वशीकरण समजतात ती हाचलाखी असल्याचे अशोक खरातने मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए असे म्हणत भोंदू अशोक खरातने SIT चौकशीत केलेल्या काळ्या करनाम्याची कबुली दिली.

खरातच्या मुलीची आज होणार चौकशी

अशोक खरातच्या मुलीची आज SIT चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशोक खरातची मुलगी तृप्ताबालाची आज एसआयटी चौकशी होणार आहे. मुलगी तृप्तीबालाच्या नावावर अशोक खरातने कोट्यावधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अशोक खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशी केली जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. तर लवकरच दुसऱ्या मुलीचीही चौकशी केली जाणार असल्याची देखील माहिती आहे. उद्या पुन्हा खरातला कोर्टात हजर केले जाणार असून पोलीस तपासाला वेग आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ram Mandir: तुम्ही जानवे घालता, मांसाहार करता का? राम मंदिराच्या CEO पदाच्या उमेदवारांना विचारले गेले १८ प्रश्न

Maharashtra News Live Update : राज्यसभेत अमित शहांना बोलवा - मल्लिकार्जुन खर्गे

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंविरोधात संजय राऊतांच्या हॉटेलमध्ये बैठका; खासदाराच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Auto Taxi Marathi Rule : मराठी आलं नाही तर लायसन होणार रद्द! आज येणार शासनाचा मोठा निर्णय; परिवहन मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT