Fresh allegations in Kharat case point to diversion of water meant for farmers, sparking outrage. 
महाराष्ट्र

Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या संस्थानला कुणी दिलं पाणी? खरातचा आणखी एक कारनामा समोर

Ashok Kharat : भोंदू खरातने अधिकारी आणि राजकीय नेत्यांना हाताशी धरुन मोठा कारनामा केलाय. त्याने चक्कं मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी पळवलंय. मात्र ते नेमकं कसं? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

ज्योतिषशास्त्राच्या आडून महिलांना जाळ्यात ओढणारा, महिलांवर अत्याचार करणारा ढोंगी कॅप्टन खरात. एसआयटीनं कॅप्टन खरातच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याचे एकेक कारनामे समोर यायला सुरुवात झालीय. नराधम खरातने सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या शिवनिक संस्थानसाठी त्यानं राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मराठवाड्यातील दुष्काळी भागातील 72 हजार शेतकऱ्यांच्या हक्काचं 39 लाख लीटर पाणी पळवण्याचं पाप केलंय.

नराधम खरातने शिवनिका ट्रस्टच्या परिसरात बाग बगिचा लावला. त्यासाठी राजकीय वजन वापरुन पाणी आणण्यासाठी 48 किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली. त्यासाठीचा प्रस्ताव पाटबंधारे खात्याला पाठवण्यात आला. पुढे पाटबंधारे खात्यानं हा प्रस्ताव गोदावरी महामंडळाला पाठवला. तत्कालिन कार्यकारी संचालकांनी 5 जानेवारी 2020 ला हा प्रस्ताव मंजूर करुन सरकारला पाठवला. पुढे दारणा धरणातून मिरगावच्या शिवनिका ट्रस्टला 39 लाख लीटर पाणी देण्यासाठी जलसंपदा खात्यानं 31 जुलै 2020 रोजी प्रस्तावाला मंजूरी दिली. आणि गोदावरी उजव्या तट कालव्यातून बिगर शेती वापरासाठी 39 लाख लीटर पाणी देण्यात आलं.

तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने खरातच्या संस्थानला पाणी देण्याबाबत घेतलेल्या निर्णयावरुन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंनी जोरदार हल्लाबोल केलाय. तर पाणी कुठं मुरतंय? याची चौकशी करण्याची मागणी ठाकरेंनी केलीय. बडे अधिकारी, राजकीय नेत्यांशी अभद्र युती करत शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी काळे कारनामे करणाऱ्या खरातच्या संस्थानला दिलं गेलं .शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी खरातसारख्या नराधमाला देणाऱ्या अधिकारी आणि मंत्र्यांवरही कारवाई करायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT