Police initiate action after obscene videos linked to Kharat case go viral on WhatsApp groups in Nashik. saam tv
महाराष्ट्र

Ashok Kharat Video: व्हॉट्स अ‍ॅपवर वासनांध खरातचे ८ अश्लील व्हिडिओ व्हायरल; ६ जणांसह अ‍ॅडमिन कचाट्यात सापडला

Kharat Case Obscene Videos Viral : पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. ‘सिडको आणि सातपूर वॉलमन’ व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता.

Bharat Jadhav

  • अशोक खरात प्रकरणातील अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसह ६ जणांवर गुन्हा दाखल

  • एकूण ८ व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप

अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. खरातने दैव शक्ती असण्याचा बनाव करत महिलांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला आहे. अशोक खरातने राज्यभरातील शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. खरात महिलांसोबत अश्लील कृत्य करत असल्याचं व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सरकारनं व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा बडगा उगारला आहे.

नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात ६ जणांसह ग्रुप ॲडमिन्सवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. खरात प्रकरणातील एकूण ८ अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ‘सिडको आणि सातपूर वॉलमन’ व्हॉट्सॲप ग्रुपवर खरातच्या अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते.

इतर ॲडमिन्सनेही व्हिडिओ पुढे फॉरवर्ड केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यात सिद्धार्थ रामोशेसह रमीज शेख, राहुल पवार, प्रवीण काटे, राहुल हिवाळे, साहिल सय्यद यांचा समावेश आहे.

काही दिवसांपासून सोशल मीडियावर पीडित महिलांचेही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगावमधील राहुल शिंदे आणि योगेश आढाव याच्यासह बीडमधील संदीप गरजे या तीन जणांच्या विरोधात अहिल्यानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

या तिघा संशयित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांच्या स्वतंत्र टीम रवाना झाल्या आहेत. अहिल्यानगर पोलिसांनी तिघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९४ (२), ३ (५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर आता नाशिकमधील सातपूर येथील ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता व आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिमालयात दिसला हनुमान? बर्फात फिरतानाचा हनुमानाचा व्हिडिओ व्हायरल

MP News : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या बसची ट्रकला धडक, भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: खरात प्रकरण; सातपूर पोलीस ठाण्यात ६ जणांसह ग्रुप ॲडमिन्सवर गुन्हा

मी शंकर तू पार्वती; गोड बोलून महिलेला लॉजमध्ये नेलं अन्...; खरातनंतर आणखी एका स्वयंघोषित गुरुचा कारनामा उघड

Social Media Ban : अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? सरकारनं उचललं महत्वाचं पाऊल

SCROLL FOR NEXT