Ashok Kharat under scrutiny as investigators uncover a massive black money and hawala network with alleged political links. Saam Tv
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? भोंदूगिरीच्या पडद्याआड 'ब्लॅक मनी'चा खेळ

ED Likely to Enter Kharat Case: भोंदू खरात श्रद्धेच्या नावाखाली महिलाचं शोषण करत असतानाच ब्लॅन मनी व्हाईट करण्यासाठी एक रॅकेट चालवत असल्याचंही उघड झालयं... त्यामुळे खरातकडे कोणत्या राजकारण्यांचा पैसा आहे? आणि खरात राजकारण्यांच्या पैशातून कॅश नेटवर्क कसं चालवायचा... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

भोंदूगिरीच्या नावाखाली कोट्यवधींच्या मालमत्ता लाटणारा अशोक खरातचा पाय खोलात आहे. उद्योजक, अधिकारी आणि राजकारण्यांच्या बेहिशोबी पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी खरातनं उभारलेलं बँकिग नेटवर्क तपासात उघड झालंय.त्यामुळे खरातच्या काळ्या कारनाम्यांच्या तपासात ईडीची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

भोंदू अशोक खरातनं हवाला रॅकेट आणि व्याजाच्या धंद्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याचं SIT चौकशीतून समोर आलयं... खरात हा त्याच्या संपर्कातील वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक आणि राजकारण्यांचा काळा पैसा जमा करुन तो व्याजाने द्यायचा, अशी माहिती सूत्रांनी दिलीय...याशिवाय तो हवालामार्फत देश-विदेशात शेकडो कोटींची हेराफेरी करत आल्याची माहिती समोर आलीय.. त्यामुळे खरातच्या आर्थिक व्यवहारांचा अहवाल आता ईडीकडे जाणार आहे ईडीच्या हाती तपासाची सुत्र जाताच खरातला ब्लॅक मनी पुरवणारे राजकारणीही अडचणीत येतील...

खरातनं महिलांचं लैंगिक शोषण केलं. मात्र दुसरीकडे त्याच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या रॅकेटची व्याप्ती मोठी आहे...खरातनं कॅश नेटवर्क'द्वारे आर्थिक साम्राज्य कसं उभं केलं ? ते पाहूयात...योजनाबद्ध पद्धतीने आर्थिक व्यवहार करणारा खरात कोणताही डिजिटल पुरावा मागे न ठेवण्याबाबत विशेष दक्ष असल्याचे बँक डिटेल्समधून स्पष्ट होतयं...

तपास पथकाने खरातची चार बँक खाती तपासली असता, फिर्यादी किंवा तक्रारदारांकडून थेट ऑनलाइन व्यवहार झाल्याचे आढळले नाही. 70 टक्के व्यवहार तो कॅश स्वरूपात करीत असे. तसचं जमीन खरेदी करताना तो स्वतःच्या किंवा पत्नीच्या नावाने खरेदी न करता पार्टनरचे नाव खरेदी खतात नमूद करीत असे. त्यामुळे एकाच्या नावे फार मोठी उलाढाल दिसायची नाही. बहुतांश व्यवहार तो रोख स्वरूपातच करत असल्यानं तपास यंत्रणांना त्याच्या फसवणुकीचा माग काढणे कठीण जात असल्याचे सूत्रांनी सांगितलयं..

मात्र खरातनं उभे केलेलं हे 'कॅश नेटवर्क' आता कोसळू लागलयं...त्याचा ऑफिस बॉय असो वा नातेवाईक प्रत्येकाच्या बँक खात्यात 'ब्लॅक मनी' पांढरा करण्याचे पुरावे सापडत आहेत. नेवासा येथील व्यापाऱ्याकडून धनादेश परत घेऊन रोख रक्कमेची केलेली मागणी, हेच सिद्ध करते की खरात किती मोठ्या आर्थिक गुन्हेगारीचा सूत्रधार आहे. त्यामुळे खरातच्या नातेवाइकांच्या बँक खात्यांचाही तपास सुरू आहे. खरातच्या 'कॅश नेटवर्क'मधील नेत्यांची नावं समोर आल्यास राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल, हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराण-अमेरिका युद्धात दहशतवाद्यांची एन्ट्री, हुथी दहशतवादी करणार जगाची नाकेबंदी?

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरातचा काळाचिठ्ठा बाहेर येणार, शिवनिका ट्रस्टचा सीए करणार पोलखोल

Maharashtra Live News Update: कुमशी ग्रामसभेत दगडफेक व मारहाण; तिघे गंभीर जखमी

मोठी बातमी! रुपाली चाकणकरांना अटक होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

गडचिरोलीत थरारक अपघात! लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला; प्रवासी बस आणि कार एकमेकांवर आदळले, 5 जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT