NCP Sabha in Hingana : काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. लवकरच नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादीचा मोठा मेळावा आयोजित केला जाणार आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजीत पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान याच मेळाव्यात आशिष देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. दरम्यान आशिष देशमुखांकडून या मेळाव्याची जोरदार तयारी सुरु असून याच महिन्याच्या शेवटी हा मेळावा होणार असल्याची माहिती आहे.
आघाडीतील हिंगणा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. दरम्यान काँग्रेसने कारवाई केल्यानंतर आशिष देशमुख राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आशिष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि अजीत पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे या चर्चांना अधिक पाठबळ मिळालं आहे.
काँग्रेसची आशिष देशमुखांना नोटीस
दरम्यान आपल्याच पक्षश्रेष्ठींविरोधात सातत्याने वक्तव्ये करणारे नागपूरचे काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांना प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बुधवारी झालेल्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, समितीचे सदस्य उल्हास पवार आणि बालचंद्र मुणगेकर यांनी बैठक घेऊन आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावून तीन दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
देशमुखांची नाना पटोलेंवर टीका
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दरमहा एक कोटी रुपये घेतात, त्यामुळे ते छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महाविकासआघाडीच्या मेळाव्याला उपस्थित राहिले नाहीत असा आरोप आशिष देशमुख यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देशमुख यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे असल्याची टीका केली होती.
देशमुखांना जबाबदारीतून मुक्त केले - अतुल लोंढे
दरम्यान आशिष देशमुख कधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर तर कधी राहुल गांधी, नाना पटोले यांच्याविरोदात सतत वक्तव्ये करत असतात. त्यामुळे पक्षाने त्यांना सर्व जबाबदारीतून मुक्त केले आहे. देशमुख यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले होते. तसेच देशमुख सध्या काँग्रेस पक्षात नसल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच सांगितले आहे.
नोटीसीवर आठ दिवसात उत्तर देण्याचे आदेश
दरम्यान काँग्रेसने आशिष देशमुखांना पाठवलेल्या नोटीसीवर आठ दिवसांच्या आत उत्तर दिले नाहीतर एकतर्फी कारवाई करण्यात येईल असाही इशारा दिला आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका देशमुख यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भाजप उमेदवार पर्वता कलबांडे यांच्यासोबत देशमुख प्रचार करीत असल्याचे फोटोही व्हायरल झाले होते.
यानंतर त्यांना निलंबित करण्याचा ठराव कॉग्रेस कमिटीच्या बैठकीत करण्यात आला. मात्र या आरोपांवर देशमुख यांनी आजवर प्रतिक्रिया दिली नाही. देशमुख यांना प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी करणे दाखवा नोटिस बजावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.