Nirmala Sitharaman On Rahul Gandhi : अदानींना काँग्रेसनेच बंदर 'गिफ्ट' दिलं, अर्थमंत्री बरसल्या; मोदी-अदानी संबंधांबाबत म्हणाल्या...

Nirmala Sitharaman Attack On Rahul Gandhi : सुरत कोर्टाने मानहानीच्या खटल्यात दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी राहुल गांधींना गुन्हेगार संबोधले आहे.
Nirmala Sitharaman Criticized Rahul Gandhi
Nirmala Sitharaman Criticized Rahul GandhiANI
Published On

Nirmala Sitharaman Criticized Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवा आदानींसोबत संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यानी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी पंतप्रधानांवर बिनबुडाचे आरोप लावण्याचा गुन्हा वारंवार करत आहेत असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे.

विशेष म्हणजे सुरत कोर्टाने मानहानीच्या खटल्यात दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी राहुल गांधींना गुन्हेगार संबोधले आहे. त्या म्हणल्या “आम्ही 2019 च्या निवडणुकीपूर्वी देखील हे पाहिले होते आणि आताही ते पुन्हा तेच करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील या सर्व खोट्या आरोपांतून ते काही धडा घेतील असे वाटत नाही". सीतारामन बंगळुरू येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

Nirmala Sitharaman Criticized Rahul Gandhi
Sharad Pawar News: पेपरमधील बातमी वाचताच शरद पवारांचं दुग्धविकास मंत्र्यांना पत्र, 'त्या' निर्णयावर घेतला आक्षेप; (पाहा व्हिडिओ)

तसेच केरळमधील काँग्रेस सरकारनेच विझिंगम बंदर अदानी समुहाला ताटात वाढून दिले होते. हा निर्णय कोणत्याही निविदेच्या आधारे घेण्यात आला नव्हता असा आरोप निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समाचार घेताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या "जर काही चुकीचे काम होत असेल तर ते काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारांमध्ये होत आहे. पण राहुल गांधी त्याबद्दल एक शब्दही काढणार नाहीत.

राहुल गांधी यांच्या मी गांधी आहे, सावरकर नाही या विधानाचा देखील सीतारामन यांनी समाचार घेतला. त्या म्हणल्या, पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याप्रकरणी राहुल गांधींनी दोन वेळा लेखी माफी मागितली आहे आणि आज ते म्हणतात की ते गांधी आहेत, सावरकर नाहीत", असा पलटवार त्यांनी राहुल गांधींवर केला. (Latest Political News)

Nirmala Sitharaman Criticized Rahul Gandhi
PM Modi Vs Congress : ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी PM मोदींची गरजच काय? काँग्रेसचा हल्लाबोल

उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान यांच्यातील काँग्रेसच्या कथित संबंधांबद्दल विचारले असता निर्मला सीतारामन म्हणाल्या, "राहुल गांधींना वाटत असेल की अदानींना या सर्व 'गोष्टी' दिल्या आहेत, तर ते खरे नाही. काँग्रेस सरकारनेच अदानींना विझिंजम बंदर ताटात सजवून दिले. ते कोणत्याही निविदेच्या आधारे दिलेले नाही. आता तेथे त्यांचे सरकार नाही, सीपीएमचे आहे. परंतु केरळने तो आदेश रद्द करण्याची मागणी करण्यापासून त्यांना कशाने रोखले? असा सवाल देखील विचारला.

तसेच "राजस्थानमध्ये संपूर्ण सौर ऊर्जा प्रकल्प अदानीला देण्यात आला. 2013 मध्ये जसे पंतप्रधान मनमोहन सिंग देशाबाहेर असताना त्यांनी अध्यादेश फाडला होता, तसेच ते अदानीसोबतचा राजस्थान करार का फाडत नाहीत?" असा सवाल देखील सीतारामन यांनी विचारला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com