महाराष्ट्र

Ashish Deshmukh Latest News: राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांवर आशिष देशमुख यांनी सोडलं मौन, म्हणाले...

Ashish Deshmukh News: राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांवर आशिष देशमुख यांनी सोडलं मौन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nagpur News: काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर आता देशमुख यांनी मौन सोडलं आहे. देशमुख म्हणाले आहेत की, ''मी कुठल्याही पक्षात जाणार नाहीय.''

Ashish Deshmukh on Rahul Gandhi: 'राहुल गांधी यांच्या हितासाठी घेतली भूमिका'

पक्षश्रेष्ठींविरोधात सातत्याने वक्तव्य केल्याने त्यांना काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यावर बोलताना ते म्हणाले आहेत की, ''महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीचे कारणे दाखवा नोटीस मला देण्यात आली आहे. यात जी दोन कारणे देण्यात आली आहे, त्या संदर्भात माझे म्हणणे आहे की, मी जी काही भूमिका घेतली, ती काँग्रेस व राहुल गांधी यांच्या हितासाठी घेतली आहे.'' (Latest Marathi News)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल देशमुख म्हणाले की, संभाजीनगर सभेला अनुपस्थिती आणि नागपूर सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी टाकलेला खोडा आहे. विधानसभेचे अध्यक्ष असताना तडकाफडकी राजीनामा दिला तेंव्हापासून संशयाची सुई नाना पटोले यांच्यावर आहे. काँग्रेस पक्षाने त्यांना पाठवलेल्या नोटीसवर ते म्हणाले की, ''नोटीसीला मी लवकरच सविस्तर उत्तर देणार.''

'पटोले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दरमहा एक कोटी रुपये घेतात'

या आधी आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर आरोप करत म्हटलं होतं की, नाना पटोले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दरमहा एक कोटी रुपये घेतात, त्यामुळे ते छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महाविकासआघाडीच्या मेळाव्याला उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या या आरोपानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देशमुख यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे असल्याची टीका केली होती.

देशमुखांना जबाबदारीतून मुक्त केले - अतुल लोंढे

दरम्यान, आशिष देशमुख कधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर तर कधी राहुल गांधी, नाना पटोले यांच्याविरोदात सतत वक्तव्ये करत असतात. त्यामुळे पक्षाने त्यांना सर्व जबाबदारीतून मुक्त केले आहे. देशमुख यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

Parenting Tips: पालकांनी मुलांना दररोज 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजे?

Heart Attack : सोमवारीच का होतो हार्टवर अटॅक, संशोधनातून नेमकं काय समोर आलं? VIDEO

Dharashiv : ST प्रवाशांचा जीव धोक्यात; महामंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडूनच विभागाचा कारभार उघड

SCROLL FOR NEXT