Pandharpur Aashadhi Ekadashi 2024 Manache Warkari Saam TV
महाराष्ट्र

Pandharpur Manache Warkari : सलग १६ वर्षांपासून पंढरपूरची वारी, यंदा मिळाला महापूजेचा मान; कोण आहेत अहिरे दाम्पत्य?

Pandharpur Aashadhi Ekadashi 2024 Manache Warkari : यंदाच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील अहिरे दाम्पत्याला मिळाला. बाळू शंकर अहिरे (वय ५५) आणि आशाबाई बाळू अहिरे (वय ५०) हे दाम्पत्य यंदा मानाचे वारकरी ठरले.

Satish Daud

सागर आव्हाड, साम टीव्ही

आषाढी एकदशीनिमित्त आज पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची महापूजा पार पडली. यंदाच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील अहिरे दाम्पत्याला मिळाला.

बाळू शंकर अहिरे (वय ५५) आणि आशाबाई बाळू अहिरे (वय ५०) हे दाम्पत्य यंदा मानाचे वारकरी ठरले. अहिरे दाम्पत्य हे नाशिक जिल्ह्यातील अंबासन (ता. सटाणा) या गावातील रहिवासी आहेत.

या दाम्पत्याचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.गेल्या १६ वर्षांपासून दोघेही नियमित आषाढीची वारी करीत आहेत. आज पंढरपुरात शासकीय महापूजेचा मान मिळाल्यानंतर अहिरे दाम्पत्याला गहिवरून आले होते. दरम्यान, शासकीय महापूजेचा मान मिळाल्यानंतर साम टीव्हीने अहिरे दाम्पत्यासोबत संवाद साधला.

"आम्ही दरवर्षी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी गाडीवर येतो. दर्शन घेतल्यानंतर निघून जातो. यंदाही देवाचे दर्शन घ्यायचं आणि घरी निघून जायचं, असं आम्ही ठरवलं होतं. पण आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विठुरायाची शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला".

"आम्ही या गोष्टीचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. गेल्या १६ वर्षांपासून आम्ही पंढरपूरची वारी करीत आहोत. विठुरायाच्या महापुजेचा मान मिळाल्याने आमचे जीवन सार्थक झाले आहे", अशी प्रतिक्रिया बाळू अहिरे आणि आशाबाई अहिरे यांनी दिली.

आता 2 तासांतच मिळणार विठुरायाचे पदस्पर्श दर्शन

दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपुरात राज्यभरातून लाखो वारकरी दाखल झाले आहे. विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषाने अवघे पंढरपूर दुमदुमून गेले आहे. दरम्यान, भाविकांना सुलभ आणि कमीत कमी वेळेत विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेता यावे, यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन व्यवस्था करणार, या दर्शन व्यवस्थेसाठी राज्य सरकारकडून तब्बल १०३ कोटींचा निधी देणार, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. लवकरात लवकर हा निधी राज्य सरकारकडून आपल्याला मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभामंडपात दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

SCROLL FOR NEXT