विठुराया, राज्यात चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्याला सुखी समाधानी राहू दे, मुख्यमंत्री शिंदेंचं साकडं
CM Eknath Shinde Pandharpur NewsSaam TV

CM Eknath Shinde : विठुराया, राज्यात चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्याला सुखी समाधानी राहू दे, मुख्यमंत्री शिंदेंचं साकडं

CM Eknath Shinde Pandharpur News : राज्यातील शेतकरी, वारकरी सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, पिक चांगलं येऊ दे, बळीराजाला सुखी-समाधानी राहू दे, असं साकडं आपण विठुरायाच्या चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले
Published on

राज्यातील शेतकरी, वारकरी सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, पिक चांगलं येऊ दे, बळीराजाला सुखी-समाधानी राहू दे, असं साकडं आपण विठुरायाच्या चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.

विठुराया, राज्यात चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्याला सुखी समाधानी राहू दे, मुख्यमंत्री शिंदेंचं साकडं
Ashadhi Ekadashi Mahapuja : पंढरपुरात विठू नामाचा गजर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा संपन्न

यावेळी मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे यांच्यासह संपूर्ण शिंदे कुटुंबिय उपस्थित होते. यंदा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील बाळू आणि आशाबाई अहिरे या दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला.

विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आपल्या कुटुंबासोबत रुक्मिणीच्या (vithal rukmini temple) पूजेला गेले. त्यांच्यासोबत मानाचे वारकरी अहिरे दाम्पत्य देखील होते. रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक मुख्यमंत्र्यांनी पूजा केली. प्रसाद म्हणून शिंदेंना श्रीफळ, तुळशी हार आणि विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा देण्यात आली.

बाळू आणि आशाबाई अहिरे यांचा सत्कार केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. राज्यातील वारकरी, शेतकरी सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, पिक चांगलं येऊ दे, बळीराजाला सुखी-समाधानी राहू दे, असं साकडं आपण विठुरायाच्या चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, यंदा पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मोठ्या संख्येने वारकरी, बंधू-भगिणी दर्शनाला आले आहेत. राज्यातील कष्टकरी, शेतकरी आणि प्रत्येक घटकाला चांगले आणि सुगीचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना आपण विठुरायाच्या चरणी केल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com