कोरोनात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा सेविकांची फिकीर कोणाला?  SaamTvNews
महाराष्ट्र

कोरोनात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा सेविकांची फिकीर कोणाला?

मागील 3 महिन्यांपासून राज्यातील 72 हजार आशा सेविका आणि 3 हजार गट प्रवर्तकांना मानधनचं मिळालेलं नाही..!

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तर अगदी आजही आपला जीव धोक्यात घालून फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या हजारो आशा सेविकांवर सध्या उपासमारीची वेळ आलीय. कारण मागील 3 महिन्यांपासून राज्यातील 72 हजार आशा सेविका (Asha Sevika) आणि 3 हजार गट प्रवर्तकांना मागील 3 महिन्यांपासून मानधनचं मिळालेलं नाही. त्यामुळे हजारो आशा सेविकांवर हलाखीची परिस्थिती ओढवलीय.

हे देखील पहा :

गेल्या 7 वर्षांपासून आशा सेविका म्हणून काम करणाऱ्या नमिता गोंदाने यांनी कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून काम केले. नमिता यांचे पती दुसऱ्या लाटेत कोरोनाचा बळी ठरले. त्यामुळे 2 मुलींसह कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आहे. दिवसभर आशा सेविका म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नमिता यांना महिन्याकाठी साडेतीन हजार रुपये इतकं तुटपुंजे वेतन (Payment) मिळतं.

ते ही वेळेवर मिळत नसल्यानं त्यात मुलींच्या शिक्षणाचा खर्च, घरातील इतर खर्च कसा भागणार? त्यामुळे नमिता यांना दिवसभर आशा सेविका म्हणून काम करून संध्याकाळी प्लॅस्टिक मटेरियल पॉलिशचं काम करावं लागतंय. त्यात त्यांच्या दोन्ही मुलीही त्यांना हातभार लावतात. तर बऱ्याचदा उधार उसनवारी करून कसे बसे दिवस काढावे लागतायत.

कोरोना (Corona) काळात घरात दोन्ही मुलींना एकटं सोडून नमिता यांनी कोविड प्रतिबंधात्मक क्षेत्रात बाधित रुग्णांच्या संपर्कातील संशयितांचे नमुने गोळा करणं, घरी औषधं देणं, संशयितांची माहिती गोळा करणं अशी अनेक कामं केली. आजही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कशाचीही पर्वा न करता त्या आपलं कर्तव्य बजावतायत. त्यांच्याप्रमाणेच राज्यातील 72 हजार आशा सेविका आणि 3 हजार गट प्रवर्तकही अगदी इमाने इतबारे दररोज आपलं कर्तव्य पार पाडतायत. अगदी आताही लसीकरणाची टक्केवारी वाढवण्याची धुरा याचं आशासेविकांच्या खांद्यावर आहे. मात्र 3 महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर कुटूंबाचा गाडा हाकण्यासाठी मोलमजुरी करण्याची वेळ आलीय.

आशा सेविकांच्या समस्या :

- 3 महिन्यांपासून मानधन नाही, राज्य सरकारने आश्वासन देऊनही 6 महिन्यांपासून वाढीव मानधन आणि प्रोत्साहन भत्ता दिलेला नाही.

- कोरोना काळात 13 आशासेविकांचा कोरोनामुळे मृत्यू

- मात्र या आशा सेविकांना अद्याप 50 लाख रुपयांचं कोरोना विमा कवच योजनेचा लाभ मिळालेला नाही.

- 22 जून 2021 मध्ये आशा सेविका संपाच्या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी आशा सेविकांना काम करण्यासाठी मोबाईल देण्याचं आश्वासन दिलं होतं.

- मात्र अद्याप काम करण्यासाठी आशा सेविकांना मोबाईल मिळालेले नाही.

- जिल्हा रुग्णालय, आरोग्य उपकेंद्रात आशा सेविकांसाठी आशा निवारा केंद्र बांधण्याचं आश्वासन

- अद्याप एकाही जिल्ह्यात आशा निवारा केंद्र नाही.

- मानधनाची स्लिप देण्याचं आश्वासन, मात्र अद्याप मानधनाची स्लिप मिळत नाही.

मागील वर्षी जूनमध्ये संप केल्यानंतर राज्यसरकारनं जुलैपासून आशा सेविकांना वाढीव मानधनासह 1 हजार रुपये तर गट प्रवर्तकांना बाराशे रुपये कोविड प्रोत्साहन भत्ता देण्याचं जाहीर केलं. मात्र जिथं मानधन 3 महिन्यांपासून मिळालेलं नाही, तिथे प्रोत्साहन भत्ता तरी कधी मिळणार? कोरोना काळात आपल्या जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या, कोविड विरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारला आपल्या हातांचं बळ देणाऱ्या या आशा सेविकांच्या मानधनासारख्या मुलभूत समस्या सोडवायला सरकारकडून दुर्लक्ष होत असेल, तर ही अतिशय संतापजनक बाब म्हणावी लागेल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

SCROLL FOR NEXT