Arrest Saam Tv
महाराष्ट्र

मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर हल्ला करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक

हल्ल्यातील मास्टर माईंड ऋषिकेश शेटे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अहमदनगर: राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh ) यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर नेवासा येथे जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यातील मास्टर माईंड ऋषिकेश शेटे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

या गोळीबार प्रकरणी राहुल राजळे यांचे बंधू विकास जनार्धन राजळे यांच्या फिर्यादीवरून नितीन शिरसाठ, बबलु लोंढे, संतोष भिंगारदिवे, ऋषिकेश वसंत शेटे आणि इतर दोन ते तीन जणांविरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नितीन शिरसाट याला अवघ्या २४ तासात जेरबंद केले होते. दुसरा आरोपी संतोष भिंगारदिवे यालासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर यामधील मास्टर माईंड ऋषिकेश वसंत शेटे हा फरार होता. शेटे यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आज पहाटे नेवासा हद्दीतून अटक केली आहे.

नेमकं काय घडल होतं

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांच्या स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर गोळीबार झाला होता. राजळे हे या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांना अहमदनगर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगरमधील घोडेगाव जवळ ही घटना घडली आहे. मंत्र्यांच्या पीएवर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांपुर्वी शंकरराव गडाख आणि त्यांचे चिरंजीव उदयन गडाख (udayan gadakh) यांना जीवे मारण्याची धमकीचा संवाद असलेली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाली होती. याची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून राहुल राजळेंवरील हल्ल्याचा आणि व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा संबध आहे का? याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

SCROLL FOR NEXT