Alibag; छोट्या व्यवसायिकांना बनावट नोटा देऊन फसविणारे त्रिकुट अटक  राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

Alibag; छोट्या व्यवसायिकांना बनावट नोटा देऊन फसविणारे त्रिकुट अटक

स्थानिक गुन्हे पथकाची कारवाई भाजी, कांदा, बटाटा, मासळी विक्रेते टार्गेट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : अलिबागमध्ये बनावट नोटा छापून छोटे व्यवसायिकांना वटविण्याचा गोरख धंदा हा सुरू होता. बनावट नोटा छापून त्या वटविणाऱ्या तिघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे पथकाने आवळल्या आहेत. त्याच्याकडून ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आले आहेत. जयदीप अजित घासे (वय- 26), सुमित सुनील बागकर (वय- 26), कौस्तुभ चंद्रकात गीजम (वय- 24) असे पकडणाऱ्या त्रिकुटाची नावे आहेत.

हे देखील पहा-

यामध्ये एकाचा शोध स्थानिक गुन्हे विभागाकडून सुरू आहे. या भामट्यांनी भाजी, कांदा, बटाटा, मासळी तसेच अन्य छोट्या व्यावसायिकांना बनावट नोटा देऊन फसविल्याची शक्यता आहे. २९ सप्टेंबर या दिवशी अलिबाग बायपास या ठिकाणी कांदा बटाटा व्यवसाय करणाऱ्या अशोक पोकळे यांच्याकडून जयदीप आणि सुमित याने कांद्याच्या २ गोणी खरेदी केले होते. त्यानंतर १०० रुपयांच्या २२ नोटा असे २ हजार २०० रुपये दिले होते.

मात्र, दिलेल्या नोटा या खोट्या असल्याचे समजल्यावर अलिबाग पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. यानुसार स्थानिक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी पथक तयार करून, या भामट्या त्रिकूटाना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून लॅपटॉप, शाई, प्रिंटर, कोरे कागद ५०० रुपयांच्या ६३ नोटा, २०० रुपयांच्या ८२ तर १०० रुपयांच्या २२ नोटा असा मुद्देमाल जप्त केला आहे. बाजारात या चलनाची किंमत ४९ हजार ९०० रुपये आहे. या भामट्यांना न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : खर्चावर नियंत्रण ठेवा, ५ राशींच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

SCROLL FOR NEXT