उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांच्या सुविधेसाठी वाहतूकीचे नियेाजन करा - परब  Saam Tv
महाराष्ट्र

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांच्या सुविधेसाठी वाहतूकीचे नियेाजन करा - परब

एसटी महामंडळाच्या राज्यभरातील विभाग नियंत्रकांसोबत मुंबईतील मुख्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कोरोना आणि त्यानंतरचा एसटी कर्मचाऱ्यांचा संप या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ गेल्या २ वर्षात वेगळ्याच परिस्थितीशी झुंज देत होते. या काळात जो विस्कळीतपणा आलेला आहे तो दूर करून उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी वाहतूकीचे नियोजन करा, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी विभाग नियंत्रकांना दिले.

हे देखील पाहा :

दरम्यान, संपानंतर कामावर रूजू झालेल्या कामगारांच्या सकारात्मक मानसिकतेसाठी समुपदेशन करावे, असे आवाहनही परब यांनी केले. सध्या सुट्टीचा मोसम सुरु आहे. या काळात सर्वसामान्य प्रवाशांना अधिकाधिक एसटीची वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी एसटी महामंडळाच्या (ST Corporation) राज्यभरातील विभाग नियंत्रकांसोबत मुंबईतील मुख्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

वाहतूक सेवा, प्रवाशी संख्या तसेच उत्पन्न वाढविण्याबरोबरच वाहतूक सुरु करण्याबाबत भेडसवणाऱ्या विविध समस्यांवर या बैठकीत उहापोह करण्यात आला. यावेळी विभाग नियत्रकांची मतेही जाणून घेण्यात आली. या बैठकीसाठी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. शेखर चन्ने यांच्यासह महामंडळातील विविध विभागाचे महाव्यवस्थापक तसेच वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना अनिल परब बोलत होते.

परब म्हणाले, गेल्या पाच महिन्यांच्या संपानंतर आपली ST पुन्हा सुरू झाली आहे. आपले कर्मचारी संपावर होते म्हणून आपण काही करू शकलो नाही. परंतू आता सर्व वाहतूक पुन्हा एकदा मार्गावर आणण्यासाठी, विस्कळलेली घडी पुन्हा व्यवस्थित बसण्यासाठी सगळयांनी मिळून प्रयत्न करावे, असे आवाहन मंत्री, ॲड. परब यांनी केले. पूर्वी जे भारनियमन होते त्यात वाढ कशी होईल यासाठी सर्व गोष्टींचे नियोजन करावे, त्यासाठी पूर्वीचे पॅटर्न बदलावे, असे सांगतानाच आवश्यक ठिकाणी महामंडळाकडून योग्य ती मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

शाळांच्या वेळेचं नियोजन करा!

पुढील महिन्यापासून शाळा सुरु होतील. काही शाळांची वेळ बदललेली असेल. त्यामुळे एकाच मार्गावरील वेगवेगळ्या शाळांसाठी बदललेल्या वेळेनुसार अनेक गाड्या सोडल्या जातात. त्याऐवजी शाळांच्या वेळेचं नियोजन करून बस सोडाव्यात, अशी सूचनाही परब यांनी केली.

यावर्षी १ हजार इलेक्ट्रिक बसेस धावणार

यावर्षी किमान १ हजार इलेक्ट्रीक बसेस आपल्याला सुरू करायच्या आहेत. तो आपला उद्देश आहे, असे सांगतानाच पर्यावरणपूरक अशा २ हजार सीएनजी इंधनावर धावणाऱ्या गाड्यांचे नियोजन केले आहे, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. शेखर चन्ने यांनी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे ४००० मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT