नागपूर : नागपूर (Nagpur) येथील गुंमगाव मध्ये शेतात पार्टी करायला गेलेल्या मित्रांमध्ये दारूवरुन वाद झाला आणि या वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुमगावमध्ये एका शेतामध्ये मित्रामित्रांनी एक पार्टी ठेवली होती. या पार्टी (Party) दरम्यान मृतक धीरज कामानिमित्त बुटीबोरीला गेला होता तर सर्वजण दारू व मटण घेऊन शेतात गेले होते. त्यांनी शेतात जेवण तयार करण्यासोबतच दारू पीत बसले होते.
याच दरम्यान मृतक धीरज उशीरा पोहोचल्यामुळे त्याच्यासाठी थोडीफार दारू शिल्लक राहिली होती शिल्लक दारू मंगेश पीत असल्याने मृतक धीरजने त्याच्याकडे दारू मागितली याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला ह्याच वादात मंगेशने धीरजच्या पोटावर चाकूने वार केला आणि तिथून लगेच पळून गेला.
हे देखील पहा -
या हाणामारीत धीरज गंभीर जखमी झाला हा प्रकार घडतच स्वप्निल आणि राजकुमार हे दोघेही घटनास्थळावरून पळून गेले त्यानंतर त्यांच्या तीन मित्रांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपास करून त्याला मृत घोषित केले माहिती मिळताच पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणातील पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.