Mantralaya mumbai News SAAM TV
महाराष्ट्र

Cm Medical Fund: तुम्हालाही घेता येईल 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी'चा लाभ, या ॲपवरून करा अर्ज; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mukhyamantri Vaidyakiya Sahayata Nidhi: तुम्हालाही घेता येईल 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी'चा लाभ, या ॲपवरून करा अर्ज; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Satish Kengar

Mukhyamantri Vaidyakiya Sahayata Nidhi:

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या 14 महिन्यात 13 हजाराहून अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.

आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी सोपे झाले असून यासाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. सीएमएमआरएफ या अँप्लिकेशनवर अर्ज भरुन मदत मिळविता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मागील वर्षी पहिल्याच जुलै महिन्यात १७८ रुग्णांना ७६ लाखांची मदत देण्यात आली. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते. या निधीचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेवी हत्तीणी प्रकरणाची सुनावणी गुरुवारी होणार

Today Gold Rate: रक्षाबंधनानंतर सोन्याचे दर ७६०० रुपयांनी घसरले; १० तोळ्याचा आजचा भाव किती?

Chhatrapati Shivaji Terminus: व्हिक्टोरिया टर्मिनसपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतचा प्रवास, वाचा रंजक माहिती

Radha Ashtami 2025 : राधा अष्टमी २०२५ कधी आहे? जाणून घ्या पूजा, मुहूर्त व महत्त्व

Mumbai Local : बदलापुरातून पनवेलला ३० मिनिटात लोकलने जा, रेल्वेचा जबरदस्त प्लॅन, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT