Thane News: ठाण्यात मोठी दुर्घटना, इमारतीची लिफ्ट कोसळून 6 जणांचा मृत्यू

Thane Elevator Accident: ठाण्यात मोठी दुर्घटना, इमारतीची लिफ्ट कोसळून 6 जणांचा मृत्यू
Thane Elevator Accident
Thane Elevator AccidentSaam Tv

Thane Elevator Accident:

ठाण्यात एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. येथे इमारतीची लिफ्ट कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळली आहे.

ज्यात सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Thane Elevator Accident
India vs Bharat Row: गेट ऑफ इंडियाला काय म्हणायचं? शरद पवारांचा 'इंडिया' नाव बदलण्यावरून मोदींवर निशाणा

घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आहेत.  (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बाळकुम येथील या ४० मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. यातच इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. वॉटरप्रूफिंगचे काम संपवून आठ मजूर हे लिफ्टने इमारती खाली येत होते. यातच लिफ्टचा दोर तुटल्याने हा अपघात घडला, असं सांगण्यात येत आहे.

Thane Elevator Accident
Aditya l-1 Mission: आदित्य एल-1ची सूर्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल; आता नेमकं कुठं पाहोचलं? जाणून घ्या नवीन अपडेट

लिफ्टचा अपघात झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी याची माहिती अग्निशमन दलाला आणि पोलिसांना कळवली. यानंतर बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कशी घडली, याबाबत अद्याप नेमकी माहिती समोर आलेली नाही. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com