Solapur District Milk Union Election: दिलीप माने, काका साठे, आवताडे, माळी यांचे अर्ज बाद विश्वभुषण लिमये
महाराष्ट्र

Solapur District Milk Union Election: दिलीप माने, काका साठे, आवताडे, माळी यांचे अर्ज बाद

जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज छाननी सोमवारी जिल्हा दूध संघाच्या सभागृहात झाली.

विश्वभुषण लिमये

सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्हा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ निवडणुकीच्या (election) अर्ज छाननी मध्ये माजी अध्यक्ष दिलीप माने, राष्ट्रवादीचे (NCP) जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे, संचालक दिपक माळी, सिद्धेश्वर आवताडे, प्रभाकर कोरे यांच्यासह २६ जणांचे अर्ज नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये बाद झाले आहेत.

हे देखील पहा-

जिल्हा दूध संघाची (District Milk Union) निवडणूक प्रक्रिया सुरू असून या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज छाननी सोमवारी जिल्हा दूध संघाच्या सभागृहात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या उपस्थितीत ही छाननी झाली. या वेळी ३५ हरकती दाखल झाले होते. यावर दुपारी ३ वाजता सुनावणी घेण्यात येऊन मंगळवारी सकाळी ११ वाजता निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये २६ जणांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

२६ बाद अर्जापैकी रेवती साखरे थकबाकीदार, मीराबाई कसबे, भीमराव कोकरे, शहाजी पाटील यांचे जातीचे प्रमाणपत्र (Certificate) नाही. उर्वरित सर्व दूध संघाला मागच्या ३ वर्षात नियमानुसार दूध पुरवठा केला नाही, म्हणून अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. अर्ज बाद झालेल्या उमेदवारांना कलम १५२ ब नुसार पुढील ३ दिवसात विभागीय उपनिबंधक (डेअरी) पुणे यांच्याकडे अपिल करू शकणार आहेत. त्या अपिलाममध्ये अर्ज मंजूर झाला तर ते निवडणुकीस पात्र होणार अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT