Schools, Colleges Reopening: आजपासून राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये शाळा, कॉलेज अनलॉक

ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आजपासून राज्यभरामधील कॉलेज परत एकदा सुरु होणार
School Reopen
School Reopen SAAM TV
Published On

मुंबई: ओमायक्रॉनचा (Omicron) प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आजपासून राज्यभरामधील कॉलेज परत एकदा सुरु होणार आहेत. नागपूर (Nagpur), पुणे, सोलापूर, वाशिमसह अनेक जिल्ह्यातल्या शाळांची (schools) घंटा देखील आजपासून वाजणार आहे.

नागपूर (Nagpur) ग्रामीण भागातील १ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यासंदर्भामध्ये आज आदेश काढले आहे. आजपासून म्हणजे फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्याच्या अनेक भागामध्ये शाळा सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये देखील शाळा सुरू करण्याविषयी मागणी आहे.

मात्र, मागील काही दिवसात कोरोना (Corona) बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी जिल्हा प्रशासनाने विविध पातळीवर शाळा आणि पालक यांचे मनोगत जाणून घेतले आहे. टास्क फोर्स कडून देखील बाधित संख्या कमी होणार, असे संकेत देण्यात आले आहे.

हे देखील पहा-

या पार्श्वभूमीवर उद्या पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरू करतांना सर्व वर्ग स्वच्छ निर्जंतूककिकरण करण्याविषयी सूचना करण्यात आली आहे. पालकांच्या परवानगीने विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घ्यायचे आहे. शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक राहणार आहे.कोविड (Covid) प्रतिबंधात्मक उपाय योजना बैठक व्यवस्थेत करण्याविषयीचे निर्देशित करण्यात आले आहे. शिवाय परिपाठ, स्नेहसंमेलन आणि इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते ते टाळणे या बाबत देखील आदेश निर्देशित करण्यात आले आहे. मास्कशिवाय शाळेतील प्रवेश वर्जित करण्यात आला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकरिता २ डोस आवश्यक करण्यात आले आहे.

पुणे (Pune) जिल्ह्यात शाळा आजपासून सुरू होणार आहेत. कोरोना नियमांचे पालन करुन विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. १ ली ते ८ वी ची शाळा ४ तास असणार आहे. शाळांमध्ये पाठवण्याचा निर्णय संपूर्ण पालकांचा राहणार आहे. शाळेची वेळ फक्त ४ तास राहणार आहे. विद्यार्थ्यांनी नाश्ता करून यायचं आहे. यानंतर जेवण घरी जाऊन करायचे आहे. रविवारी आणि सोमवारी शाळा सॅनिटाइज करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत.

वाशिम (Washim) जिल्ह्यात ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा महाविद्यालय उद्या पासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सरकारने घालून दिले असलेले नियम पाळून शाळा महाविद्यालय सुरू केले जाणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

School Reopen
Vaijapur Accident: मुलाचा सुखी संसार बघण्याअगोदरच वडिलांचा मृत्यू, ४ ठार

सोलापूर (Solapur) शहरातील शाळा आजपासून सुरु होणार आहेत. सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. कोरोना नियमांचे पालन करुन सोलापूर महापालिका क्षेत्रातील शाळा आजपासून सुरू होणार आहेत.

धुळे (Dhule) जिल्ह्यामध्ये कालपासून १ ली ते ८ वीच्या शाळा सुरु झाले आहेत. आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद दिसून आला आहे. यावेळी शासनाच्या नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांची थर्मामिटरने तपासणी करून त्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने आठवड्यातून ३ दिवस शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने विद्यार्थी संख्या वाढवण्यात येणार आहे. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण देखील करण्यात येणार असून शाळा परत एकदा सुरू झाले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

चंद्रपुरामध्ये (Chandrapur) आजपासून परत एकदा शाळेची घंटा वाजली आहे. ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग आजपासून सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये जानेवारीच्या सुरुवातीला जिल्ह्यामधील शाळा सरसकट बंद करण्यात आले होते. मात्र मागील काही दिवसात प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल होणारी रुग्णसंख्या कमी असल्याने जिल्हा प्रशासनाने टप्प्या- टप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल डिस्टसिंग- थर्मल स्क्रिनिंग- सॅनिटायझेशन आदी गोष्टींची काळजी घेत विद्यार्थ्यांकरिता परत एकदा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा परत सुरू झाल्यामुळे विद्यार्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com