Vaijapur Accident: मुलाचा सुखी संसार बघण्याअगोदरच वडिलांचा मृत्यू, ४ ठार

वऱ्हाडाच्या गाडीवर काळाचा घाला नवरदेवाच्या वडिलांसह चौघांचा मृत्यू
Vaijapur  Accident
Vaijapur Accidentsaam tv
Published On

जालना: नवरदेवाच्या वडिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जालना (Jalna) जिल्ह्यातील हतवण येथे आपल्या मुलाच लग्न (marriage) पार पडलं आहे. या सोहळ्याकरिता गौतमनगर, चुंचाळे शिवारातील रहिवासी आयशर ट्रकमधून वऱ्हाडी म्हणून शनिवारी नाशिकमधून (Nashik) निघाले होते. मोरे कुटुंबियांचा लग्न सोहळा आटोपून सर्व वऱ्हाडी मंडळी रविवारी मांडवातून परत येत होते. औरंगाबाद (Aurangabad) ओलांडल्यावर वैजापूर तालुक्यात शिवराई गावाजवळच रविवारी त्यांच्या आयशर गाडीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली आहे.

हे देखील पहा-

या धडकेमुळे साखरझोपेत असलेल्या वऱ्हाडींना भयानक हादरा बसला. या भीषण अपघातामध्ये (accident) गौतमनगर आणि चुंचाळे घरकुल या दोन्ही भागांतील ५ रहिवाशांसह आयशर ट्रकचालकाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी (police) यावेळी सांगितले आहे. ललिता पवार, कविता वडमारे, प्रज्ञा गायकवाड या ३ महिलांसह नवरदेवाचे वडील पंडित मोरे तसेच ७ वर्षाचा चिमुरडा मोनू वाहुळे याचा मृतांमध्ये समावेश आहे. आयशरचालकाचे नाव उशिरापर्यंत समजू शकले नाही. सोमवारी रात्री चिमुकल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

Vaijapur  Accident
Health Budget 2022: आरोग्यसेवा डिजिटल करण्यावर भर- अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या

रात्री उशिरापर्यंत गौतमनगर, चुंचाळे भागात मृतदेह त्यांच्या नातेवाईकांद्वारे आणण्यात येत होते. या घटनेमुळे सर्वत्र शांतता पसरली होती. या घटनेमुळे येथील रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. या भीषण दुर्घटनेमध्ये २५ ते ३० वऱ्हाडी जखमी झाल्याची माहिती उशिरापर्यंत हाती आली आहे. यापैकी तिघांची प्रकृती खूपच चिंताजनक आहे. जखमींवर वैजापूरच्या जिल्हा रुग्णालय आणि घाटी येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तसेच काही जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात देखील सोमवारी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गौतमनगर, शांतीनगर, रमाबाई आंबेडकर घरकुल परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com