मुख्यमंत्र्यांनी दानवेंचा केला ''माझे भावी सहकारी'' असा उल्लेख... twitter/@cmomaharashtra
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी दानवेंचा केला ''माझे भावी सहकारी'' असा उल्लेख...

याप्रसंगी व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हेदेखील उपस्थित होते. यावेळी दानवे माझे भावी सहकारी आहेत असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद: ७४ व्या मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद शहरात पोहोचले. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचा शुभारंभ करत अनेक घोषणा केल्या. तसेच जिल्हा प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आणि पैठण येथील संतपीठाचे उद्घाटनही त्यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हेदेखील उपस्थित होते. यावेळी दानवे माझे भावी सहकारी आहेत असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून चांगलीच फटकेबाजी केल्याने एकच हशा पिकला. (The Chief Minister said raosaheb Danve is "my future colleague" ...)

हे देखील पहा -

आपल्या भाषणात रावसाहेब दानवेंना उद्देशून बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ''एकमेकांकडून अपेक्षा आहेत, अपेक्षेशिवाय आयुष्य नाही. मी तुम्हाला शब्द देतो की, जर तुम्ही मुंबई-नागपुर बुलेच ट्रेनसाठी पुढाकार घेणार असाल कर हे सरकार मजबुतीने तुमच्या पाठीमागे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. आमची अपेक्षा अशी होती की, मुंबई-अहमदाबादपेक्षा नागपुर-मुंबई बुलेट ट्रेन व्हावी, राज्याची राजधानी आणि उप-राजधानी जोडण्यासाठी बुलेट ट्रेन होत असेल तर प्रेझेंटेशनही देऊ नका मी तुमच्या सोबत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

रावसाहेबांचा किस्सा

आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी रावसाहेब दानवेंनी सांगितलेल्या एका आठवणीचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्हा परिषदवाले पैसे देत नव्हते, कारण त्यांना तुमच्यावर (दानवेंवर) विश्वास नव्हता, आजही आहे की नाही, माहित नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आणि एकच हशा पिकला. तेव्हा मुख्यमंत्री मिश्किलपणे म्हणाले की, गंमतीचा भाग सोडा. रावसाहेब जुने सहकारी आहेत बऱ्याच दिवसांनी भेटले आहेत थोडीशी गंमत-जंमत केली नाही तर मजा येत नाही अशी फटकेबाजी मुख्यमंत्र्यांनी केली. तसेत जिल्हा परिषदेती इमारत उत्तम आणि वेळेत झाली पाहिजे तुम्हाला कुठंही पैसे कमी पडू देणार नाही असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उपसरपंचाच्या डोक्यात गोळी लागली, कारमध्ये आढळला मृतदेह; बीडमध्ये धक्कादायक घटना

गृहमंत्र्यांना कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही – अतुल लोंढे यांची टीका|VIDEO

Gen Z सोशल मीडियावर सर्वाधिक काय पाहतात?

लेक प्रेमात पडली, बाप हैवान झाला! मुलीचा झोपेतच गळा आवळला, नंतर जे केलं ते वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

Kacchya kelyachi Bhaji Recipe: झटपट बनवा कच्च्या केळ्याची खमंग भाजी!

SCROLL FOR NEXT