७४ व्या मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली अनेक आश्वासनं... पहा काय म्हणाले

७४ व्या मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत.
७४ व्या मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली अनेक आश्वासनं... पहा काय म्हणाले
७४ व्या मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली अनेक आश्वासनं... पहा काय म्हणालेfacebook/@CMOMAHARASHTRA
Published On

औरंगाबाद: ७४ व्या मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री हे औरंगाबादमध्ये येत असल्यामुळे मराठा क्रांती मोर्चा, एमआयएम, मनसे आणि इतर संघटनांच्या वतीने विविध मुद्द्यांवर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र हे आंदोलन करू नये यासाठी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले तर काही जणांची धरपकड सुरू आहे. औरंगाबाद शहरातल्या वेगळ्या भागात एमआयएमचे कार्यकर्ते थांबले आहेत, या मार्गातून मुख्यमंत्री जातील त्या ठिकाणी उपरोधिक फलक दाखवून आंदोलन केले गेले. (On the occasion of 74th Marathwada Liberation Day, the Chief Minister gave many promises ... see what he said)

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये बोलताना म्हणाले की, ''आजचे निमित्त आहे, ज्या गोष्टी करण्यासारखे त्या घोषित करतोय. पाणीपुरवठा योजनेवर नुसते बोलत होतो, आता पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून माझी आहे, त्याची सुरुवात झाली आहे. औरंगाबादचे पर्यटन वाढले पाहिजे, परदेशात आपलं वैभव दिसलं पाहिजे. उस्मानाबादला वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरू केले आहे. यापूर्वी भूमिपूजन दरवर्षी केले जायचे. आता भूमिपूजन नाही, त्या कामाचा शुभारंभ करायला आलोय. औरंगाबाद-शिर्डी हवाई वाहतूक करण्यासाठी प्रयत्न केले जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

हे देखील पहा -

खरा विकास तुम्ही पाहिलाच नाही, आता खरा विकास पाहणार आहात

विकासाच्या मुद्द्यावर मुख्यमंंत्री म्हणाले की, ''खरा विकास तुम्ही पाहिलाच नाही, आता खरा विकास पाहणार आहोत. परभणीसाठी पाणीपुरवठा योजना करणार आहोत तसेच परभणी आणि उस्मानाबादला भूमिगत गटार योजना पूर्ण करू'' अस आश्वासन यावेळी त्यांनी दिलं. त्याचप्रमाणे हिंगोळीला हळद प्रक्रिया केंद्र सुरू करणार, औरंगाबादमध्ये सफारी पार्क सुरु करणार, २०० मेगा वॉटचे मराठवाड्यात सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरू करणार अशी अनेक आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत.

७४ व्या मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली अनेक आश्वासनं... पहा काय म्हणाले
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन; धनंजय मुंडेंनी केलं हुतात्म्यांना अभिवादन

तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गुंठेवरीचा प्रश्न निकाली काढला आहे. नुसत्या कागदावर योजना नको, त्याची पूर्तता करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्याचप्रमाणे घृष्णेश्वर मंदिराचे बांधकाम नव्यानं करत असूम किमान 100 वर्ष चांगले टिकले पाहिजे असं काम करणार असल्याचा दावा त्यांनी केला. सोबतच औंढा नागनाथ, नरसी नामदेव परिसरात विकसित केले जाणार आहे असल्याचीही त्यांनी माहिती दिली. तसेच ''हे आम्ही करीत नाहीत, हे तुम्ही करताय, तुमचे आशीर्वाद करीत आहेत. जे जाहीर केले आहे, हे बळ तुमच्या आशीर्वादातुन मिळाले आहे. तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली आहे'' असं वचन मुख्यमंत्र्यानी मराठवाड्याला दिलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com