महाराष्ट्र

Chhatrapati SambhajiNagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 30 वर्षांनंतर अनुराधा चव्हाण-संजना महिला आमदार

Chhatrapati SambhajiNagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 30 वर्षांनंतर महिला आमदार मिळाले. फुलंब्रीमधून भाजपच्या अनुराधा चव्हाण आणि कन्नडमधून शिवसेनेच्या संजना जाधवांच्या रूपाने दोन महिला आमदार मिळाल्या आहेत

Dhanshri Shintre

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 30 वर्षांनंतर महिला आमदार मिळाले. फुलंब्रीमधून भाजपच्या अनुराधा चव्हाण आणि कन्नडमधून शिवसेनेच्या संजना जाधवांच्या रूपाने दोन महिला आमदार मिळाल्या आहेत. यापूर्वी १९९० च्या दशकात तेजस्वीनी जाधव या कन्नड विधानसभेच्या आमदार होत्या. विशेष म्हणजे तेजस्विनी जाधव यांच्यानंतर त्यांच्या सून संजना जाधव आमदार झाल्या आहेत. त्यांनी विभक्त पती हर्षवर्धन जाधव यांचा पराभव करून तालुक्याच्या नेतृत्वाची धुरा हाती घेतली आहे.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून अनुराधा चव्हाण या जिल्ह्यातून सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या युतीच्या उमेदवार आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात यावेळी दोन महिलांना शिवसेना आणि भाजपच्या वतीने संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने करीत दोन्ही महिलांनी यश प्राप्त केले. तेजस्विनी जाधव यांच्यानंतर तब्बल ३० वर्षांनंतर जिल्ह्याला संजना जाधव व अनुराधा चव्हाण या दोन महिला आमदार मिळाल्या आहेत.

कन्नडचे आमदार रायभान जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तेजस्विनी जाधव यांना संधी देण्यात आली होती. या निवडणुकीत जिल्ह्याच्या पहिला महिला आमदार होण्याचा बहुमान तेजस्विनी जाधव यांना मिळाला होता. परंतु, १९९० नंतर एकदाही जिल्ह्यात महिला आमदार मिळाल्या नाहीत.

सलग ३० वर्षांनंतर २०२४ मध्ये कन्नड तालुक्यातून संजना जाधव, तर फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण या दोन महिला आमदार मिळाल्या आहेत. जाधव आणि चव्हाण या पहिल्यांदाच निवडणुकीस उभ्या होत्या. जाधव यांच्याविरोधात त्यांचे हर्षवर्धन जाधव आणि विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत हे निवडणुकीच्या रिंगणात होते, तर जाधव यांच्याविरोधात मातब्बर विलास औताडे रिंगणात होते. या सर्वांवर मात करीत दोन्ही महिला आमदारांचा दणदणीत विजय झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

Eknath Shinde : राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत २६ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी

Ishan Kishan, IPL Mega Auction: काव्या मारणने डाव टाकला! मुंबईच्या विश्वासू खेळाडूला घेतलं संघात

SCROLL FOR NEXT