Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut: संजय राऊतांना दिलासा! नाशिक सत्र न्यायलयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Sanjay Raut: बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका, असं वक्तव्य संजय राऊत यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत केलं होतं.

अभिजीत सोनावणे

Nashik News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिकमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका, असं वक्तव्य संजय राऊत यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत केलं होतं.

संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात राऊत यांच्या विरोधात कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणी संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. (Latest News Update)

काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊत यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे राजकीय भूमिकेतून कार्यकर्ते व शिवसेना नेत्यांना त्रास देत आहेत असा आरोप केला होता. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सरकार अवैध पद्धतीने सत्तेत आले आहे, असे निरीक्षण नोंदवल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका- संजय राऊत

राज्यातलं सरकार तीन महिन्यात जाणार असून राज्यातील प्रशासन आणि पोलिसांना माझे आवाहन आहे की, त्यांनी बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका. बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश जर पाळाल तर तुम्ही अडचणीत याल, तुमच्यावर खटले दाखल होतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 'खुर्च्या तोडण्यासाठी नको तर परिवर्तनासाठी नगरपालिका हवी' देवेंद्र फडणवीसांचा शिंदेसेनेला टोला

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT