Dharashiv News Saam Digital
महाराष्ट्र

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

Dharashiv Medical College Hospital : ताप आणि इतर आजारांवरील उचारासाठी धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात १६ बालक दाखल झाली होती. त्यांना इंजेक्शन दिल्यानंतर ताप आणि उलटी सुरू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Sandeep Gawade

ताप आणि इतर आजारांवरील उचारासाठी धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात १६ बालक दाखल झाली होती. त्यांना इंजेक्शन दिल्यानंतर ताप आणि उलटी सुरू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. बालकांना अॅटिबायोटीकचे इंजेक्शन दिल्यानंतर थंडी वाजून येणे,उलट्या होणे असा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे त्या बॅचमधील इंजेक्शन बाहेर काढून नवीन इंजेक्शन मागवण्यात आले. त्यानंतर पुढील ट्रिटमेंट सुरू करण्यात आली आहे. तसेच बालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयात प्रशासनाने दिली आहे. या प्रकारामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाली आहे. तर नातेवाईकांनी डॉक्टर देखील दोन तास उपलब्ध नसल्याचा आरोप केला आहे.

रोहयोच्या संतप्त मजुरांनी पंचायत समितीतच प्राशन केले कीटकनाशक

रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्व कामे मजुरांना काम दिली जातात. मात्र या योजनेंतर्गत एका विहिरीचे खोदकाम मजुरांना लावून केलं जात नव्हतं. यामुळे संतप्त झालेल्या दोन मजुरांनी पंचायत समितीच्या कार्यलयातच विषारी कीटकनाशक प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर विहिरीचे खोदकाम सुरू करण्यात आले होते. मात्र हे काम रोहयोच्या मजुरांमार्फत न करता जेसीबीच्या साह्याने केले जात होते. याबाबत विचारणा करून देखील हाताला काम मिळत नसल्याने संतप्त झालेल्या मानोली येथील दोघांनी पंचायत समिती कार्यालय मानवत येथे किटनाशक औषध प्राशन केल्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सदाशिव शिंदे व सुरेश मांडे असे या दोघा मजुरांचे नावे आहेत.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Signs of brain tumor: मेंदूमध्ये तयार होत असलेल्या गाठीला कसं ओळखाल? शरीरात दिसणाऱ्या 'या' 5 बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra Monsoon Update : मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस बरसणार ; जाणून घ्या सविस्तर

GK: दोन राष्ट्रपती असलेला एकमेव देश कोणता? ९९% लोकांना माहित नसेल

Ladki Bahin Yojana: २७ हजार लाडक्या बहिणींचे ₹१५०० कायमचे बंद, लाडकीचा अर्ज का केला बाद?

SCROLL FOR NEXT