Beed Police  Saam Tv
महाराष्ट्र

Beed: पोलिस दलात खळबळ! बीडमध्ये ACBची मोठी कारवाई, २ पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Beed Police: बीडमध्ये २ पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. एसीबीने बडीमध्ये ही मोठी कारवाई केली. वाळू माफियांकडून या पोलिसांनी पैसे मागितले होते. ५० हजार रुपये घेताना त्यांना पकडण्यात आले.

Priya More

Summary -

  • बीडमध्ये एसीबीने पोलिस अधिकाऱ्याविरोधात मोठी कारवाई केली

  • चकलांबा पोलिस ठाण्याचे एपीआय संदिप पाटील आणि कॉन्स्टेबल सुरवसे यांना ताब्यात घेण्यात आले

  • दोघांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं

  • वाळू माफियाकडून कारवाई टाळण्यासाठी ही लाच मागण्यात आल्याचे समोर

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. पोलिस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. हा पोलिस अधिकारी वाळू माफियांकडून लाच घेत होता. या घनटेमुळे बीडच्या पोलिस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एसीबीने पोलिस अधिकारी आणि कॉन्स्टेबलला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय संदिप पाटील याच्यासह पोलिस कॉन्स्टेबल सुरवसे यांच्यावर एसीबीने कारवाई केली. या दोघांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. एपीआय संदिप पाटील यांनी एका वाळु माफियाकडे ८० हजार रुपये मागितले होते. तडजोडअंती ६०००० रुपये देण्याचे ठरले. कारवाई टाळण्यासाठी वाळू माफियांकडून त्यांनी पैसे मागितले होते.

यामधील ५०००० रुपये पोलिस कॉन्स्टेबल सुरवसे याच्याकडे देण्यास संदिप पाटील याने सांगितले होते. ५० हजार रुपये स्वीकारताच पोलीस कॉन्स्टेबल सुरवसेसह संदिप पाटील यांना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. चकलांबा पोलिस ठाण्यात दोन्ही पोलिसांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादोघांची देखील एसीबीकडून कसून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कौटुंबिक वाद शिगेला पोहोचला, संतापलेल्या पत्नीनं नवऱ्याला 'नको तेथे मारलं', अन्...; मुंगेरमधील धक्कादायक घटना

Maharashtra News Live Update: राजूर हत्याकांड प्रकरण; दोन पोलीस निरीक्षकांच निलंबन

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून नवनीत राणांना उमेदवारी? तटकरेंनी एका वाक्यात विषय संपवला

Akkalkot : अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला गेलाय? मग न विसरता फिरा 'हे' ५ पिकनिक स्पॉट्स

Cabinet Expansion: मोदी सरकारमध्ये मोठा उलटफेर; केंद्रीय मंत्रिमंडळाचा होणार विस्तार

SCROLL FOR NEXT