अनुराधा नागवडे 
महाराष्ट्र

विधानसभा नंतर, आधी माझ्याविरूद्ध झेडपी लढा! शेलारांचे आव्हान

साम टीव्ही ब्युरो

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंद्यात राजकीय घमासान सुरू आहे. नागवडे कुटुंबियांविरोधात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णा शेलार सरसावले आहेत. त्यांनी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या अनुराधा नागवडेंनाच आव्हान दिलंय.

शेलार म्हणतात, विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. शिवाय मलाही उमेदवारी करायची नाही. आरक्षण सोयीचे असले, तर बेलवंडी जिल्हा परिषद गटातून पुन्हा मैदानात आहोत. कारखाना निवडणुकीतही सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी सगळी ताकद लावणार आहे. विधानसभेची तयारी करणाऱ्या नागवडे कुटुंबाने आपल्याविरुद्ध जिल्हा परिषद निवडणूक लढवून दाखवावी. Anna Shelar's challenge to Anuradha Nagwade

शिवाजीराव नागवडे यांच्याविषयी आदर व्यक्त करताना शेलार म्हणातात, बापूंचा त्याग, संघर्ष माहिती आहे. पण विकासात त्यांच्याशिवाय कुटुंबाचे योगदान काय. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतः थांबून नागवडेंना संधी दिली. हा त्याग नव्हता का. गेल्या साडेचार वर्षांत त्यांनी या गटासाठी काय भरीव कामे केली, याचा हिशोब द्यावा. ‘बापूं’च्या नावाची सहानुभूती घेण्यापेक्षा स्वकर्तृत्व काय, हेही सांगावे.

विधानसभा लढण्याच्या त्यांच्या घोषणेबद्दल द्वेष नाही. मात्र ते आता हयात नसणाऱ्या नेत्यांच्या नावावर सहानुभूती मिळवित आहेत. सदाशिव पाचपुते व नागवडे यांचे कधीच जमले नाही. प्रा. तुकाराम दरेकर यांना कारखान्याला उमेदवारी मिळू नये, यासाठी ‘बापूं’च्या अंगावर फाइल कुणी फेकली, असाही सवाल त्यांनी केला.

शेलार म्हणाले, कारखान्यात घोटाळा करणाऱ्या राजेंद्र नागवडे यांना बिनविरोध होऊ देणार नाही. ज्या केशव मगर यांनी ‘बापूं’ची सावली बनून कारभार केला. त्यांना अपात्र ठरविण्याची चाल खेळणाऱ्यांचा कारभार बाहेर काढणार आहोत. कारखाना बिनविरोध केवळ मगर यांना अध्यक्ष केले, तरच होऊ शकतो, अन्यथा लढाई निश्चित आहे.

‘‘मी सध्या सगळ्या पक्षांचा कार्यकर्ता आहे. मित्रत्वाचे नाते सगळ्यांशी आहे. ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन आपल्याला आहेच. शिवाय राहुल जगताप हेही मित्र आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षातून लढायचे, हे त्यावेळी ठरवू. मात्र, आपल्याविरुद्ध नागवडे यांनी बेलवंडी गटातून उभे राहून दाखवावे. मग विधानसभेचे पाहू, हे आपले आव्हान समजावे,’’ असेही शेलार म्हणाले. Anna Shelar's challenge to Anuradha Nagwade

आमदार बबनराव पाचपुते यांचा खासगी कारखाना असल्याने सहकार त्यांच्या हाती द्यायचा का, असा सवाल करणाऱ्या नागवडे कुटुंबाचे आता दोन खासगी साखर कारखाने झाले आहेत. पर्यायाने सहकार चालविण्याचा अधिकार नसल्याचे आपोआप सिद्ध होत असल्याने कारखाना केशव मगर यांच्या ताब्यात द्यावा, असेही शेलार यांनी आवाहन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT