Hingoli News  Saam TV
महाराष्ट्र

Hingoli News : वाह रं पठ्ठ्या! शेतकऱ्याच्या पोरानं पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत मिळलं घवघवीत यश

Ruchika Jadhav

UPSC Exam :

सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेक विद्यार्थी यूपीएससी आणि एपपीएससीच्या परीक्षा देतात. कालच यूपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल लागला. या निकालात हिंगोलीच्या एका तरुणाने पहिल्याच प्रयत्नाच यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. त्याची गगनभरारी पाहून सर्वांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय.

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शिवणी या ग्रामीण भागातील अंकेत जाधवने हा पराक्रम केला आहे. अंकेतला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळालंय. कुठल्याही शिकवणी वर्गाशिवाय तसेच रुग्णांची सेवा करत या पठ्ठ्याने यूपीएससी क्रॅक केलीय.

हिंगोली जिल्ह्याची कळमनुरी तालुक्यातील शिवणी या खेडेगावात अंकेतचा जन्म झाला. त्याचं प्राथमीक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालं.पुढे पाचवीपासून ते दहावीपर्यंतचं शिक्षण त्याने कळमनुरीच्या महात्मा फुले विद्यालयात पूर्ण केलं.

अंकेतच्या घरी आई, वडिल शेती व्यवसाय करतात. अंकेत त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. आपला मुलगा अभ्यासात हुशार असल्याचं च्याच्या आई बाबांनी वेळीच ओळखलं होतं. त्यामुळे पोटाला चिमटा घेत त्यांनी मुलाला उच्चशिक्षिण दिलं.

12 वी पूर्ण केल्यानंतर त्याने पुणे येथे एम. बी. बी. एस.चं शिक्षण घेतलं. यावर त्याला कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी म्हणून नोकरी मिळाली. वैद्यकीय सेवा देत असताना त्याने यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. यामध्ये त्याने घवघवीत यश मिळवले आहे. डॉक्टर अंकेत जाधवला यूपीएससीमध्ये ३९५ वा रँक मिळालाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

Maharashtra Weather: पुढील ५ दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून यलो अलर्ट जारी; वाचा आजचे हवामान

Horoscope Today : धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल, मानसिक ताण जाणवेल; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT