Sanjay Biyani saam tv
महाराष्ट्र

Sanjay Biyani: माझ्या पतीच्या खूनाचा तपास CBI ला साेपवा : अनिता बियाणी

दरम्यान यापुर्वी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील संजय बियाणी हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयला द्यावा असे म्हटले हाेते.

संतोष जोशी

नांदेड : नांदेड (nanded) येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (sanjay biyani) यांच्या हत्या होऊन महिना झाला तरी अद्याप पोलिसांना (police) मारेकरी सापडले नसल्याने संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता यांनी पाेलीस प्रशासनावर (nanded police) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनिता बियाणी यांनी माझ्या पतीच्या खूनाचा तपास सीबीआयला (CBI) साेपवा अशी मागणी केली आहे.(sanjay biyani latest marathi news)

संजय बियाणी यांची पाच एप्रिलला भर दिवसा गोळ्या झाडून हत्या झाली होती. त्यानंतर नेते मंडळींनी बियाणी कुटुंबियांची भेट घेत या प्रकरणाचा तातडीने तपास करु असे आश्वासन दिले हाेते.

दरम्यान साम टीव्हीशी बाेलताना बियाणी यांच्या पत्नी अनिता म्हणाल्या पोलिसांना आम्ही वेळोवेळी सहकार्य करत आहोत. एसआयटी मार्फत तपास करुन ही पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. त्यामुळे खूनाचा तपास सीबीआयला साेपवावा अशी आम्ही मागणी केली आहे. येत्या १५ दिवसांत आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठाेठावणर असल्याचे अनिता बियाणींनी नमूद केले.

दरम्यान यापुर्वी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील बियाणी हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयला द्यावा असे म्हटले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : दोन बसचा समोरासमोर अपघात; २५ प्रवासी जखमी, कन्नड- चाळीसगाव बायपास रोडवरील घटना

Nashik News : दिवाळीनिमित्त परिवार बाहेरगावी; बांधकाम व्यवसायिकाच्या घरी २२ लाखांची चोरी

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

Maharashtra News Live Updates: निवडणूक आयोगाकडे मिलिंद देवरा यांच्या विरोधात तक्रार

VIDEO : 'फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही', मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

SCROLL FOR NEXT