Lumpy Virus, Satara Saam Tv
महाराष्ट्र

Lumpy Skin Disease : सांगली, कोल्हापूर, सोलापूरात 'लम्पी' चा प्रादुर्भाव वाढला, साता-यात जनावरांच्या वाहतुकीसह बैलगाडा शर्यतीवर बंदी

सुमारे 20 हजार जनावरांचे लसीकरण लवकरच पूर्ण हाेईल अशी माहिती प्रशासनाने दिली.

ओंकार कदम

Satara News : सांगली, कोल्हापूर व सोलापूर या शेजारील जिल्हयात लम्पी चर्म रोग प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. तसेच सातारा जिल्हयातील क-हाड व फलटण तालुक्यात तुरळक ठिकाणी लम्पीचा प्रादुर्भाव सुरु आहे. (Maharashtra News)

या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हयातील सर्व गोवर्गीय बाजार तसेच गोवर्गीय जनावरांच्या वाहतुकीवर पुर्ण बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी नुकतेच दिले आहेत.

या आदेशानुसार जिल्ह्यातील आठवडा बाजारात गोवर्गीय जनावरांची खरेदी, विक्री तसेच गोवर्गीय जनावरांची वाहतूक करणेत येवू नये. जनावरांचे प्रदर्शन, यात्रा, तसेच बैलगाडा शर्यतीचे आयोजन पुढील आदेश होईपर्यंत करणेत येऊ नये.

फलटण, कराड, कोरेगाव व माण या तालुक्यातील 9 गावांमध्ये लम्पी चर्म रोगाची लागण झाली आहे. यामध्ये 26 गाय व 15 बैल असे एकूण 41 जनावरांना लंपी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर एका जनावराचा मृत्यु झाला असून 3 जनावरे नियमित औषधाने बरी झाली आहेत असेही प्रशासनाने नमूद केले.

सातारा जिल्हयातील एकूण 3 लाख 52 हजार 436 गोवर्गीय जनावरांपैकी 3 लाख 23 हजार 67 जनावरांचे लम्पी चर्म रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित जनावरांची लसीकरण मोहीम वेगाने सुरु असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न - महेश गायकवाड

Pooja Sawant: 'कलरफुल' पूजा सावतचं मनमोहक सौंदर्य, फोटोंनी वाढवली काळजाची धडधड

Bigg Boss 18: विवियनने रजतला खाली आपटलं; बिग बॉसच्या घरात नवीन राडा, पाहा VIDEO

Whatsapp: व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फिचर; व्हिडीओ कॉल करणं आता झालं अधिक सोपं

Prajakta Mali Farmhouse: निसर्गाच्या सानिध्यात वसलंय प्राजक्ताचं सुंदर 'प्राजक्तकुंज'; फार्महाउसचं एका दिवसाचं भाडं किती?

SCROLL FOR NEXT