sayali trimbake from satara
sayali trimbake from satara saam tv
महाराष्ट्र

Satara: अनाथ प्राण्यांची तारणहार Rescue Mom सायली त्रिंबके काळाच्या पडद्याआड

साम न्यूज नेटवर्क

सातारा : Rescue Mom म्हणून परिचित असलेली साया अनिमाल केअरच्या संचालिका सायली त्रिंबके (sayli trimbake) यांचे मुंबईत निधन झाले. आज (रविवार) संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव गडकर आळी येथील निवासस्थानी आणले जाणार आहे अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. (sayali trimbake from satara passes away in ghatkopar)

भटक्या कत्र्यांसाठी (dogs) सायली हिने आपल जीवन समर्पित केले होते. लाॅकडाउनच्या (lockdown) काळात त्यांनी अनेक भटक्या प्राण्यांची (animal lover) देखभाल केली. ज्या ज्या भागात आवश्यकता पडेल तेथे त्या जाऊन प्राण्यांना खाऊ घालत असतं. त्यांच्या कार्याची अनेक (satara) संस्था, संघटनांनी दखल घेऊन त्यांचा सन्मान देखील केला आहे.

sayli trimbake

सायली यांचा प्रतापगंज पेठ येथे ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. एकदा त्या पार्लरमध्ये झाेपी गेल्या हाेत्या. त्यावेळी त्यांना रस्त्यावर काही हालचाली जाणवल्या. त्यांनी उठून पाहिल्यानंतर त्यांना चाेरीच्या हेतुने काेणी तरी आल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ परिचित लाेकांना फाेन करुन हा प्रकार सांगितला.

त्यानंतर त्यांनी शटर उघडून त्या लाेकांचा पाठलाग केला. या घटनेतून सायली त्रिंबके यांनी दुचाकी चाेरी करणारी टाेळी शाहूपूरी पाेलिसांना पकडून दिली. त्यानंतर पाेलिस दलाने सायली यांच्या धाडसाचे काैतुक करुन त्यांचा सन्मान केला हाेता. आज त्यांच्या निधनाचे वृत्त समजातच साता-यातील प्राणीमित्र संघटनांनी त्यांना आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT